मुंबई :  पॅन कार्ड आधारसह लिंक (Pan-Aadhar Link) करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. मात्र यानंतर आयकर विभाग (Income Tax) पुन्हा मुदतवाढ देईल, असं वाटत नाही. त्यामुळे पॅन कार्डधारकांना सातत्याने पॅन-आधारसह लिंक करण्याचं आवाहन करण्यात येत आहे. केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्डाने (CBDT) 30 जूननंतर पॅन -आधार लिंक करणाऱ्यांकडून 1 हजार रुपये विलंब शुल्क (Late Fine) आकारण्यात येणार आहे. कोणत्याही विलंब शुल्काशिवाय कुणीही पॅन-आधार लिंक करु शकणार नाही. 31 मार्च 2023 पर्यंत पॅन-आधार लिंक करता येणार आहे. (it income tax department pan with aadhar link is compulsory know how to link)


आयकर विभागाची सूचना  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आयकर विभागाने पॅन-आधार कार्डसह लिंक न करणाऱ्यांना ठणकावून सांगत इशारा दिलाय. आयटीने ट्विट करत हा इशारा दिलाय. 31 मार्च 2023 पर्यंत पॅन-आधार लिंक न केल्यास पॅन कार्डाचा काहीही उपयोग राहणार नाही, असं या ट्विटमध्ये सांगितलंय. 


पॅन कार्ड डीएक्टीव्हेट झाल्यास म्युचुअल फंड, स्टॉक आणि बँक खातं उघडता येणार नाही.   तसेच पॅन कार्डचा पुरावा म्हणूनही उपयोग करता येणार नाही. शिवाय 10 हजार रुपयांपर्यंत दंडही भरावा लागू शकतो. 


पॅन-आधार लिंक कसं करायचं? 


- www.incometax.gov.in या वेबसाईटवर जा.  


- quick links section मध्ये गेल्यानंतर  'आधार' वर क्लिक करा.  


-  नवी विंडो ओपन होईल. इथे पॅन, आधार आणि मोबाईल नंबर टाका.  


- त्यानंतर 'I validate my Aadhaar details' हा पर्याय निवडा.  


-  मोबाईलवर एक ओटीपी येईल. तो एंटर करुन Validate वर क्लिक करा.  


- दंडाची रक्कम भरल्यानंतर पॅन-आधारसोबत लिंक होईल.