ट्विटरकडून IT मंत्री रविशंकर प्रसाद यांचे अकाऊंट ब्लॉक; Koo वर शेअर केला स्क्रिनशॉट
ट्विटर आणि भारत सरकारमध्ये तणाव वाढताच आहे. नव्या आयटी नियमांबाबत सरकार आणि ट्विटर यांच्यात मोठे मतभेद आहेत.
नवी दिल्ली : ट्विटर आणि भारत सरकारमध्ये तणाव वाढताच आहे. नव्या आयटी नियमांबाबत सरकार आणि ट्विटर यांच्यात मोठे मतभेद आहेत. नुकतेच ट्विटरने केंद्रीय IT मंत्री रविशंकर प्रसाद यांचे अकाऊंट ब्लॉक केले.
आयटी मंत्री रविशंकर प्रसाद यांचे ट्विटर अकाऊंट 1 तास ब्लॉक होते. ट्विटरने याचे कारण देताना म्हटले की, रविशंकर प्रसाद यांनी ट्विटरच्या धोरणांचे उल्लंघन केले आहे. एका तासानंतर रविशंकर प्रसाद यांचे अकाऊंट अनब्लॉक करण्यात आले.
ट्विटरच्या मॅसेजचा स्क्रीनशॉट रविशंकर प्रसाद यांनी Koo या सोशल मीडिया अॅपवर शेअर केला. त्यात त्यांनी म्हटले की, एका तासापासून ट्विटरने त्यांचे अकाऊंट ब्लॉक केले आहे.
रविशंकर प्रसाद यांनी ट्विट करीत म्हटले की, ट्विटरद्वारा करण्यात आलेली कारवाई आयटी ऍक्टचे उल्लंघन आहे. ट्विटरचे धोरण योग्य नाही.