मुंबई : येणारी आठ दहा वर्ष माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रासाठी खडतर असतील असं इ्न्फोसिसचे नारायण मूर्ती म्हणतायेत.


येणारी आव्हानं 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

माहिती-तंत्रज्ञान (आयटी) क्षेत्रापुढे आगामी काळात मोठी आव्हानं उभी ठाकणार आहेत. त्यामुळेच या क्षेत्रातल्या संधीवर त्याचा परिणाम होणार आहे. या क्षेत्रात नवीन नोकऱ्या निर्माण होण्याचं प्रमाण कमी होईल तसंच कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीवर त्याचा परिणाम होईल.


अमेरिकेचं नवं धोरण


आयआयटी पवईच्या 'मूड इंडिगो' महोत्सवात मार्गदर्शन करताना नारायण मूर्तींनी भविष्यातल्या धोक्याची सूचना दिली.  
माहिती-तंत्रज्ञान (आयटी) क्षेत्रातल्या उत्तम पगाराच्या नोकऱ्यामुळे तरुणांचा कल या क्षेत्राकडे असतो. अमेरिकेने स्थानिक उद्योगांना प्रोत्साहन देण्याचं धोरण स्वीकारलय. याला अनुसरूनच आयटीक्षेत्राला तिथे प्रोत्साहन दिलं जातय. याचा परिणाम भारतातल्या आयटी कंपन्यांवर होणार आहे. या क्षेत्रात होणारी गुंतवणूक कमी होत जाऊन यातल्या रोजगाराच्या संधीसुद्धा कमी होत जाणार आहेत. 


नव्या संधींना ओहोटी


आयटीतले उच्च पदस्थ मोठाले पगार घेतात. या क्षेत्रातल्या कंपन्यांना होत असलेला नफा कमी होत चालला आहे. परिणामी नव्याने नोकर भरती किंवा नव्यानेत येणाऱ्या कर्मचाऱ्यांना देण्यात येणाऱ्या पगारावर याचा परिणाम होणार आहे.