नवी दिल्ली : लोकांना प्रेरणा मिळावी म्हणून स्मारक आणि मूर्त्या उभारल्या असे स्पष्टीकरण बसपा प्रमुख मायावती यांनी दिले आहे. उत्तर प्रदेशात मायावतींच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात त्यांनी राज्यभरात स्मारके आणि मुर्त्या उभारल्या होत्या. हा मुद्दा त्यावेळी खूपच गाजला. रोजगार, शिक्षण अशा गोष्टींसाठी खर्च करण्याऐवजी मुख्यमंत्री स्मारके बांधण्यावर पैसा उधळत असल्याची टीका त्यांच्यावर झाली. हा संपूर्ण खर्च मायावतींकडून वसूल करावा अशी जोरदार मागणी करण्यात आली. यासंदर्भात अनेक याचिकाही दाखल करण्यात आल्या.  उभारण्यात आलेल्या स्मारकांबाबत आणि मूर्त्यांबाबत दाखल याचिकेवर मायावतींच्या वतीने उत्तर देण्यात आले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING



या मूर्त्यांवर आणि स्मारकांवर करण्यात आलेला खर्च मायावतींकडून वसूल करावा अशी मागणी करणारी ही याचिका आहे. मात्र अशा मूर्त्या आणि स्मारक उभारावी अशी भावना जनमानसात होती आणि तशीच इच्छा बसपाचे संस्थापक कांशीराम यांची असल्यानं मूर्त्या आणि स्मारक उभारल्याचं मायावतींचं म्हणण आहे.



यावर खर्च झालेला पैसा शिक्षणासाठी किंवा रूग्णालयांसाठी वापरावा का ? हा वादाचा मुद्दा आहे. लोकांना प्रेरणा मिळावी म्हणून स्मारक आणि मूर्त्या उभारल्याचही मायावतींनी म्हटले आहे. हत्तींची केवळ शिल्प आहेत. त्यात बसपाच्या चिन्हाचा प्रचार करण्याचा प्रश्नचं नाही असे स्पष्टीकरणही मायावतींनी दिले आहे.