नवी दिल्ली : दिवाळीच्या मुहूर्तावर, अनेक कंपन्यांकडून ग्राहकांसाठी नव-नवीन प्रोडक्ट्स लॉन्च केले जातात. अनेक क्षेत्रांत व्यवहार करणाऱ्या आयटीसी (ITC) कंपनीने या फेस्टिव्ह सीजनमध्ये जगातील सर्वात महागडं चॉकलेट लॉन्च केलं आहे. या चॉकलेटची किंमत जवळपास ४.३ लाख रुपये प्रति किलोग्रॅम असल्याचं सांगण्यात आलं आहे. कंपनीने चॉकलेट फॅबेल (Fabelle) बँडसह लॉन्च केलं आहे. महागड्या चॉकलेटच्या बाबतीत ITCच्या या प्रोडक्टची गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद करण्यात आली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बाजारात अशाप्रकारचं महागडं चॉकलेट लॉन्च झाल्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधी २०१२ मध्ये डेन्मार्कमधील अर्टिसन फ्रिर्ट्स हे जगातील सर्वात महागडं चॉकलेट असल्याची माहिती आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या चॉकलेटची किंमत जवळपास ३.३९ लाख रुपये प्रति किलोग्रॅम इतकी होती.



आयटीसीच्या फूड डिपार्टमेन्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनुज रुस्तगी यांनी दिलेल्या माहितीनुसार, फॅबेल ब्रँडने नवा बेन्च मार्क सेट केल्याचा आनंद झाल्याचं त्यांनी सांगितलं. केवळ भारतीय बाजारातच नाही तर संपूर्ण जगातच ही एक मोठी कामगिरी आहे. याचं नावं गिनीड वर्ल्ड रेकॉर्डमध्ये सामिल होणं ही अभिमानाची बाब असल्याचं ते म्हणाले.


 


चॉकलेटच्या किंमतीसह चॉकलेटच्या बॉक्सची किंमतही जबरदस्त आहे. चॉकलेटचं हे लिमिटेड एडिशन हाताने बनवलेल्या लाकडी बॉक्समध्ये मिळणार आहे. यात १५ ग्रॅमची १५ ट्रफल्स असणार आहेत. सर्व करांच्या किंमतीसह या बॉक्सची किंमत एक लाख रुपये असणार आहे.



चॉकलेटचा व्यवसाय अधिक फायद्याचा आहे. फॅबेलच्या या चॉकलेटसाठी वेगळी ऑर्डर द्यावी लागले. त्यामुळे हे चॉकलेट दिवाळीपूर्वी लॉन्च केलं आहे. या प्रोडक्टसाठी अनेक HNIने रुची दाखवली असल्याचं अनुज रुस्तगी यांनी सांगितलं.