मुंबई : ITR Refund Status : प्राप्तिकर विभागाकडून आर्थिक वर्ष 2021-22 साठी ITR रिटर्न भरण्याची अंतिम तारीख 31 जुलै 2022 होती. यावेळी विभागाने शेवटच्या तारखेबाबत कोणताही बदल केला नाही. मात्र, शेवटची तारीख वाढवण्याची मागणी प्राप्तिकरदात्यांनी केली होती. 31 जुलैनंतर आयकर रिटर्न भरणाऱ्यांना दंड भरावा लागणार आहे.


स्थिती जाणून घ्या


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तुम्ही ITR भरला असेल, तर तुम्हाला तुमचा परतावा मिळेल. त्यामुळे परतावा मिळण्याची तुम्ही वाट पाहू शकता. आयकर विभाग आयटीआर दाखल केल्यानंतर 10 दिवसांनी आयटीआर परतावा तपासण्यासाठी करदात्यांना पर्याय दिला जातो. काही करदाते, असे आहे की, ज्यांना आयटीआर दाखल केल्यानंतर 10 दिवसांपेक्षा जास्त कालावधी लागतो. त्यामुळे ते त्यांची आयटीआर परताव्याची स्थिती ऑनलाइन तपासू शकतात.


तुम्ही स्थिती कशी ऑनलाइन तपासाल


- सर्वप्रथम आयकर पोर्टल eportal.incometax.gov.in ला भेट द्या.
- तुमचा यूजर आयडी आणि पासवर्ड वापरुन लॉग इन करा.
आता My Account वर जा आणि Refund/Demand Status वर क्लिक करा.
आता ड्रॉप डाऊन मेनूमध्ये इन्कम टॅक्स रिटर्न निवडा आणि सबमिट पर्यायावर क्लिक करा.
त्यानंतर पावती क्रमांकावर क्लिक करा.
येथे ITR च्या तपशीलांसह एक नवीन वेब पृष्ठ उघडेल. येथे तुम्हाला परतावा जारी करण्याच्या तारखेबद्दल देखील माहिती मिळेल.


तसेच NSDL वेबसाइटवरुन स्थिती तपासू शकता. करदाते NSDL वेबसाइटला भेट देऊन पॅन क्रमांकाद्वारे त्यांचा ITR परतावा देखील तपासू शकतात . येथे पॅन क्रमांक टाकल्यानंतर, मूल्यांकन वर्षावर जा आणि सबमिट वर क्लिक करा. आता तुम्हाला ITR रिफंडची स्थिती कळेल.


5.83 कोटी लोकांनी दाखल केला ITR


2021-22 या आर्थिक वर्षात 5.83 कोटी लोकांनी आयटीआर भरला होता. शेवटच्या तारखेला म्हणजेच 31 जुलै रोजी ITR दाखल करणाऱ्यांची संख्या विक्रमी 72.42 लाख होती. यावेळी सरकारकडून  ITR रिपर्न भरण्याच्या अंतिम तारखेत कोणताही बदल करण्यात आलेला नाही.