मुंबई : ITR भरण्याची अंतिम मुदत 31 जुलै होती. यानंतर आयटीआर भरणाऱ्यांना दंड भरावा लागणार आहे. ज्यांनी आयटीआर भरला आहे त्यांना रिफंड मिळणार की नाही. त्यांच्या रिफंडचं स्टेटस काय याची माहिती कशी शोधायची याबाबत आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रिफंड स्टेटस पाहाणं खूप सोपं आहे. तुम्ही आयकर विभागाच्या वेब पोर्टलवर भेट देऊन देखील चेक करू शकता. तिथे तुम्हाला पॅन नंबर अपलोड करून माहिती भरायची आहे. 


आयटीआर फाईल केल्यानंतर आयकर विभागाकडून दहा दिवसांपर्यंत रिफंड देऊ शकते. तर तुमचं आयटीआर ई व्हेरिफिकेशनच्या 20 ते 60 दिवसांपर्यंत देखील रिफंड मिळू शकतं. जर तुम्हाला यानंतरही रिफंड मिळाला नसेल तर तुम्ही आयकर विभागाकडून आलेला ई मेल तपासणं गरजेचं आहे. याशिवाय तुम्ही ऑनलाईन वेबसाईटवर जाऊन देखील तपासू शकता. 


आयटीआर रिफंड स्टेटस तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने चेक करू शकता. ई-फाइलिंग पोर्टल आणि एनएसडीएल (NSDL) वेबसाईटवरून तुम्हाला चेक करता येणार आहे. तुमच्या पॅननंबरच्या मदतीने तुम्ही आयकर विभागाच्या वेबसाईटवर जाऊन देखील रिफंडचे स्टेटस चेक करू शकता. 


पॅन नंबरने कसं करायचं स्टेटस चेक
सगळ्यात आधी incometax.gov.in या वेबसाईटला भेट द्यायची आहे. तिथे तुमचे PAN डिटेल्स भरा. त्यानंतर ई फाईल ऑप्शनवर क्लीक करा. तुम्हाला इनकम टॅक्सवर सिलेक्ट करून व्ह्यू फाईल रिटर्नवर क्लीक करायचं आहे. तिथे तुम्हाला ITRचं स्टेटस पाहता येणार आहे. तिथे तुम्हाला रिफंड मिळणार की नाही. ते कधीपर्यंत मिळणार याचे संपूर्ण डिटेल्स पाहता येणार आहेत.