ITR Filing Date Extended : जर तुम्ही अजूनही इन्कम टॅक्स रिटर्न (ITR) भरला नसेल, तर ही बातमी तुम्हाला नक्कीच दिलासा देईल. केंद्र सरकारने पुन्हा एकदा इन्कम टॅक्स रिटर्न (ITR Filing Last Date) दाखल करण्याची अंतिम तारीख वाढवली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यापूर्वी शेवटची तारीख होती ३१ डिसेंबर 
नवीन मार्गदर्शक तत्त्वांनुसार आता 15 मार्चपर्यंत इन्कम टॅक्स रिटर्न भरता येणार आहे. सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेस (CBDT) कडून सांगण्यात आलेल्या माहितीनुसार Assessment Year 2021-22 साठी इन्मक टॅक्स रिटर्न भरण्याची तारीख 15 मार्च 2022 पर्यंत वाढवण्यात आली आहे. याआधी आयटीआर फाइल करण्यासाठी 31 डिसेंबरपर्यंतची मुदत देण्यात आली होती.


या कारणास्तव वाढवली मुदत
कोरोना महामारीमुळे करदात्यांना होत असलेल्या अडचणी लक्षात घेऊन ITR भरण्याची तारीख पुन्हा वाढवण्यात आल्याचं CBDT कडून सांगण्यात आलं  आहे.  सीबीडीटीने जारी केलेल्या अधिसूचनेत असंही म्हटलं आहे की, प्राप्तिकर कायदा 1961 च्या तरतुदींनुसार विविध लेखापरीक्षण अहवालांच्या ई-फायलिंग दरम्यान येणाऱ्या समस्यांमुळे ही मुदत वाढवण्यात आली आहे.