नवी दिल्ली : बजेटमध्ये इनकम टॅक्सबाबत कोणतीही मोठी घोषणा नाही झाली. पण अंतरिम बजेटमध्ये केली गेलेली घोषणा कायम ठेवण्यात आली आहे. तुमचं वार्षिक उत्पन्न ५ लाख रुपये आहे तर त्यावर तुम्हाला कोणताही टॅक्स भरावा लागणार नाही. पण येथे एक ट्विस्ट आहे. ही सूट वार्षिक उत्पन्नावर लागू नाही होत. अंतरिम बजेटमध्ये रिबेटच्या आधारावर ५ लाखापर्यंतच्या उत्पन्नावर सूट आहे. नव्या व्यवस्थेनुसार ५ लाख रुपयांपर्यंत सूट आहे. पण यासाठी तुम्हाला आयटीआर म्हणजेच इनकम टॅक्स रिटर्न (ITR) भरणं गरजेचं आहे. तुम्हाला वाटत असेल की आपण टॅक्सच्या नियमांपासून वाचलो आहोत तर हे चुकीचं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आतापर्यंत २.५ लाखापर्यंतच्या उत्पन्नावर टॅक्समध्ये सूट होती. तर वरिष्ठ नागरिकांनी ३ लाखापर्यंत ही सूट होती. पण हे जाणून घेणं गरजेचं आहे की ५ लाखापर्यंतच्या उत्पन्नावर सूट कशी मिळेल?


५ लाख उत्पन्नावर सूट कधी?


मोदी सरकारने मागच्या कार्यकाळातील अंतरिम बजेटमध्ये रिबेट देण्याची घोषणा केली होती. या रिबेटसह ५ लाखापर्यंतच्या उत्पन्नावर सूट असणार आहे. सूट आणि कापून कुपून हातात आलेल्या रक्कमेवर टॅक्स लागतो. टॅक्‍स मोजल्यानंतर रिबेट तुम्हाला इनकम टॅक्‍सच्या रकमेत दिलासा देतो. ही ती रक्कम असते ज्यावर तुम्हाला कर नाही भरावा लागत. उदा. कलम 87A अंतर्गत मिळणाऱ्या रिबेट नुसार जर तुमचं वार्षिक उत्पन्न ३.५ लाख रुपयांपेक्षा कमी आहे तर तुम्ही २५०० रुपयांपर्यंतच्या रिबेटचा दावा करु शकता.


टॅक्स फ्री कसं होणार ५ लाखापर्यंतचं उत्पन्न


एखाद्या व्यक्तीचं वार्षिक उत्पन्न ५ लाख रुपये आहेय. त्यात त्याला ५० हजार रुपये HRA मिळतो. सूट नंतर त्याचं उत्पन्न ४.५ लाख रुपये झाली, समजा त्याने कलम ८० सी नुसार १.५ लाखांची कुठे गुंतवणूक केली आहे. तर त्याचं आता वार्षिक उत्पन्न ३ लाख झालं. ज्यावर ५ टक्के टॅक्स लागणार. म्हणजेच त्याला २५०० रुपये टॅक्स भरावे लागणार. पण २५०० रुपयांचं आता रिबेट मिळत असल्याने त्याला तो टॅक्स भरावा लागणार नाही.


तरच मिळणार सूट


५ लाख रुपये वार्षिक उत्पन्न असलेल्या आयकर कायदा ८७ ए नुसार सूट दिली जाणार आहे. ही सूट तेव्हाच मिळेल जेव्हा तुम्ही आयटी रिटर्न भरणार आहात. जर तुम्ही आयटीआर नाही भरलं तर तुम्हाला आयकर विभागाची नोटीस येऊ शकते. त्यामुळे सूट मिळवण्यासाठी तुम्हाला आयटीआर भरावंच लागणार आहे. तुम्हाला रिबेट म्हणून सूट तेव्हाच मिळेल जेव्हा तुम्ही तुमचं उत्पन्न जाहीर कराल.


ITR साठी पॅनकार्ड अनिवार्य नाही


इनकम टॅक्स रिटर्न भरण्यासाठी आता पॅनकार्ड अनिवार्य नसणार आहे. पॅननंबर नसेल तरी तुम्ही इनकम टॅक्स रिटर्न भरु शकता. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी म्हटलं की, आता ITR साठी पॅनकार्ड आवश्यक नाही. फक्त आधारकार्ड असेल तरी तुम्ही आयटीआर भरु शकता. सरकार इनकम टॅक्स नोटीस पाठवण्यासाठी एक वेगळी समिती बनवणार आहे.


टॅक्स स्लॅब


२.५ लाखापर्यंत कोणताही टॅक्स नाही.
२,५०,००१ ते ५,००,००० पर्यंत उत्पन्नावर ५ टक्के टॅक्स
५,००.००० ते १० लाखपर्यंतच्या उत्पन्नावर २० टक्के टॅक्स
१० लाखापेक्षा अधिक उत्पन्नावर ३० टक्के टॅक्स