`तूम्ही अजूनही ITR भरला नाही का? लवकर भरा, `हे` आहेत चार फायदे...
इनकम टॅक्सने ३१ जुलै २०२२ ही आयटीआर भरण्याची लास्ट डेट दिली आहे.
मुंबईः इन्कम टॅक्स रिटर्न (ITR) भरण्याची शेवटची तारीख जवळ येत आहे. मात्र शेवटच्या तारखेची वाट न पाहता 'हे' महत्त्वाचे काम आजच करा कारण इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याचे अनेक फायदे आहेत, ज्यामुळे तुम्हाला मोठे फायदे मिळू शकतात.
रिटर्न भरून तुम्ही इनकम टॅक्स भरणाऱ्यांच्या ग्रुपमध्ये येता. इनकम टॅक्सने ३१ जुलै २०२२ ही आयटीआर भरण्याची लास्ट डेट दिली आहे. या तारखेपर्यंत, टॅक्सपेअर्स FY 2021-22 साठी त्याचे returns भरू शकतात. जर ते नाही भरलेत कर तूम्हाला दंड भरावा लागेल. कर टाळण्यासाठी लोक नवनवीन मार्ग शोधत असतात, पण याचे फायदेही अधिक आहेत.
1- कर्ज घेताना बँक किंवा कोणतीही Financial institution तूमच्या इनकमचा विचार करून त्यानूसार लोन देते. तेव्हा तुम्ही भरलेला इन्कम टॅक्स रिटर्न (ITR) खूप उपयुक्त ठरू शकतो, तसे Confirmation तूम्हाला मिळते. अनेक Financial institution तुमच्या ITR मध्ये टाकलेल्या माहितीच्या आधारे लोन देतात. त्यामुळे आयटीआर लोन घेण्यासाठी उपयुक्त ठरू शकते.
2- तुमचा व्यवसाय असेल तर तुमच्यासाठीही ITR खूप फायदेशीर ठरते. जे किमान गेल्या दोन ते तीन वर्षांपासून ITR भरत आहेत त्यांना मोठ्या कंपन्या prefer करतात. तुम्ही ITR फाइल केल्यास तुमचाही या यादीत समावेश होईल. अशा प्रकारे यामुळे तुमचा व्यवसाय वाढू शकतो.
३- ITR तुम्हाला घर खरेदी आणि विक्री करण्यास किंवा बँकांमध्ये मोठ्या प्रमाणात पैसे जमा करण्यास आणि म्युच्युअल फंडमध्ये invest करण्यास मदत करते. जर तुम्ही ITR फाइल करत असाल आणि म्युच्युअल फंडात मोठी रक्कम गुंतवायची असेल तर काहीच चिंता नाही.
4- जर तुम्हाला स्वतःसाठी 1 कोटी रुपयांपर्यंतचे insurance घ्यायचे असेल तर ITR तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरू शकते. याचे कारण असे की अनेक insurance कंपन्या insurance मिळवण्यासाठी तुमच्याकडून ITR ची demand करतात. insurance कंपन्यांकडून खरेतर तुमचे income आणि तुमची consistency ITR द्वारे चेक केली जाते.