आंध्र प्रदेश : लोकसभा निवडणूक २०१९ सह आंध्रप्रदेशात ११ एप्रिल रोजी विधानसभेसाठी मतदान घेण्यात आले. २०१४ मध्ये विजयी ठरलेले चंद्राबाबू नायडू यांना यंदाच्या निवडणूकांमध्ये वायएसआर काँग्रेसचे जगन मोहन रेड्डी यांनी चांगलीच टक्कर दिली आहे. राज्यातील १७५ विधानसभा जागांसाठी २ हजार ११८ उमेदवार निवडणूक रिंगणात उभे होते. यापैकी सर्व जागांवर वायएसआर आघाडीवर असून नायडू पिछाडीवर आहेत. वायएयआर विधानसभा जागांवर आघाडीवर असून सत्तारुढ तेलुगू देसम पार्टी पिछाडीवर आहे. त्यामुळे आता राज्यात वायएसआर काँग्रेसचा विजय पक्का असल्याची चिन्ह आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राज्यात तेलुगू देसम पार्टी आणि वायएसआर काँग्रेस यांच्यात लढत आहे. भाजप आणि काँग्रेसनेही सर्व जागांवर आपले उमेदवार उतरवले आहेत. आंध्रप्रदेश विधानसभा निवडणूका निकालांच्या सुरुवातीला वायएसआर काँग्रेसला बहुमत मिळाले आहे. जगनमोहन रेड्डी यांचा पक्ष वायएसआर काँग्रेस १४५ जागांवर पुढे आहे. २०१४ साली चंद्राबाबू नायडू यांच्या तेलुगू देसम पार्टीला बहुमत मिळाले होते.