Jagriti Yatra 2024: देशभरात भारतीय रेल्वेचे जाळे पसरलेले आहे. देशाचा कानाकोपरा रेल्वेने जोडला आहे. देशात हजारो ट्रेन धावतात. वेळापत्रकानुसार या ट्रेन धावतात. लाखो प्रवासी यातून प्रवास करतात. भारतात मात्र, एक अशी अनोखी ट्रेन धावते जी वर्षातून एकदाच धावते. या ट्रेनमधून सर्वसामान्य प्रवासी नाही तर 500 हून अधिक तरुण प्रवास करतात. वर्षातून एकदा 15 दिवस देशभर फिरणाऱ्या  या ट्रेन मधून प्रवास करणाऱ्या तरुणांना प्रवासादरम्यानच नोकरी मिळते. जाणून घेऊया या


हे देखील वाचा...महाराष्ट्रातील एकमेव गाव जिथे घराबाहेर पार्क केलेल्या असतात होड्या; पाण्यात दडलेलं कोकणातील छुपं बेट


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जागृती यात्रा असे या अनोख्या ट्रेन सफरीचे नाव आहे. ही ट्रेन वर्षातून एकदाच धावते. 15 दिवसांचा हा प्रवास असतो. या प्रवासादरम्यान ट्रेन 8000 किलोमीटरचे अंतर कापतो भारतातील 12 ठिकाणी थांबा घेते. दरवर्षी जवळपास 500 तरुण तरुणी या जागृती यात्रेत सहभागी होतात. या सर्व तरुणांना नोकरी मिळते.  


हे देखील वाचा... महाराष्ट्रातील हनीमून स्पेशल स्पॉट! कमी बजेटमध्ये बेस्ट ट्रीप, बेंगलोर, गोवा आणि काश्मिरला देतात टक्कर 


मुंबईच्या जागृती सेवा या स्वयंसेवी संस्थेद्वारे या जागृती यात्रेचे आयोजन केले जाते.  2008 पासून ही ट्रेन सुरु झाली आहे. आतापर्यंत 23 देशांतील 75 हजारांहून अधिक तरुण तरुणांनी या जागृती यात्रेत सहभागी होऊन या अनोख्या ट्रेन सफरीचा अनुभव घेतला.  जागृती यात्रेच्या पहिल्या  ट्रेनला "रतन टाटा" यांनी स्पोन्सर केले होते.  


या ट्रेनचे बहुतांश प्रवासी तरुण उद्योजक असतता.  तरुण उद्योजकांना जोडणे, त्यांचे नेटवर्क तयार करणे आणि त्यांना मार्गदर्शन करणे हा या ट्रेन सफरीचा एकमेव उद्देश आहे. या 15 दिवसांच्या प्रवासात सुमारे 100 पेक्षा अधिक मार्गदर्शक तरुणांना कृषी, शिक्षण, ऊर्जा, आरोग्य, उत्पादन, पाणी आणि स्वच्छता, कला-साहित्य आणि संस्कृती या विषयांवर उपलब्ध संधी आणि उपाय सुचवतात.


एकूण 8000 किमीच्या प्रवासादरम्यान ही ट्रेन भारतातील 10 ते 12 शहरांमध्ये जाते आणि 500 ​​प्रवासी ट्रेनमध्ये चढतात.  यावर्षी 16 नोव्हेंबरपासून जागृती यात्रा मुंबईपासून सुरू होणार आहे. हुबळी, बेंगळुरू, मदुराई, चेन्नई, विशाखापट्टणम, दिल्ली या शहरांमधून जाईल आणि 1 डिसेंबरला अहमदाबादमध्ये या यात्रेचा समारोप होणार आहे. जागृती यात्रा नावाच्या संकेत स्थळावर या यात्रेत सहभागी होण्यासाठी नोंदणी करावी लागते.