महाराष्ट्रातील एकमेव गाव जिथे घराबाहेर पार्क केलेल्या असतात होड्या; पाण्यात दडलेलं कोकणातील छुपं बेट

कोकणातील अतिश सुंदर आणि गर्दीपासून अलिप्त असलेलं छुपं बेट. 

| Nov 11, 2024, 22:22 PM IST

Juve Island Ratnagiri : एक टुमदार घर आणि घराबाहेर स्वत:ची कार किंवा बाईक... असं अनेकांचे स्वप्न असतं. मात्र, घराबाहेर होडी असेल तर? काल्पनिक वाटतयं नाही. मात्र, ही कल्पना नाही तर हे खरं आहे. आपल्या महाराष्ट्रात एक असं गाव आहे. जिथे घराबाहेर बाईक किंवा कार नाही तर होड्या पार्क केलेल्या असतात. चारही बाजूने पाण्याने वेढलेले हे गाव कोकणातील एक छुपं बेट आहे. या सुंदर बेटाची सफर म्हणजे स्वर्गाची सफर असाच अनुभव येईल.  

1/9

 पृथ्वीवरचा स्वर्ग... असे कोकणाचे वर्णन केले जाते. याच कोकणात  सुंदर समुद्र किनाऱ्यांसह अनेक छुपी पर्यटनस्थळ आहेत. यापैकीच एक आहे चारही बाजूने पाण्याने वेढलेले छुपं गाव. इथं घराबाहेर होड्या पार्क केलेल्या असतात.   

2/9

रत्नागिरीतून राजापूर आणि मग जैतापूर असा बस प्रवास. यानंतर मग जैतापूरहून होडी किंवा बोटीतून दुवे गावात पोहचता येते.

3/9

पर्यटन दृष्ट्या या गावाचा मोठ्या प्रमाणात विकास झालेला नाही. यामुळे हे ठिकाण पर्यटकांपासून अलिप्त आहे. 

4/9

नारळी-पोफळीच्या बागा. मधोमध भुई... आणि चहुबाजूंनी निळेशार पाणी... या गावचे निसर्ग सौंदर्य मन मोहून टाकणारे आहे. 

5/9

राजापूरची अर्जुना नदी अर्धचंद्राकृती आकार जिथे घेत तिथेच हे सुंदर ठिकाण आहे.  

6/9

चारही बाजूंनी समुद्रांनी वेढलेल्या या गावात जाण्यास होडीशिवाय पर्याय नाही.   

7/9

जैतापूर, बुरंबेवाडी व धाऊलवल्ली यांच्या मध्ये जैतापूर खाडीत जुवे हे गाव आहे.  

8/9

जैतापूरजवळ धाऊलवल्लीजवळ हे जुवे बेट आहे.   

9/9

कोकणातील या छुप्या बेटाचे नाव आहे जुवे बेट.