कर्नाटक : स्वप्न उराशी बाळगून प्रत्येकजण त्यापद्धतीने प्रयत्न करत असतो. पण आयुष्यात एखादी घटना अशी घडते की, आपलं स्वप्न मागे राहून जातं. पण खचून न जाता आपल्या ध्येयाकडे पुन्हा अगदी डोळसपणे बघणं खूप महत्वाचं असतात. असं करणारी माणसं फार कमी असतात. सध्या अशाच एका अवलियाची जोरदार चर्चा रंगली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कर्नाटकमध्ये एका खुनाच्या संदर्भात 14 वर्षे तुरूंगवास भोगून एका व्यक्तीने 40 व्या वर्षी डॉक्टर होऊन आपलं स्वप्न पूर्ण केलं आहे. कर्नाटकमधील कलबुर्गीमध्ये अफझलपुरचे रहिवाशी सुभाष पाटील. 1997 मध्ये एमबीबीएसकरता कॉलेजमध्ये ऍडशिमन घेतलं होतं. 



डॉक्टर बनून रूग्णांची सेवा करण्याचं त्यांच ध्येय. पण एका खुनाच्या आरोपाखाली त्यांना अटक झाली. 2000मध्ये हे वादळ सुभाष पाटील यांच्या आयुष्यात आलं. मुळतः सेवाभावी वृत्ती असल्यामुळे जेलमध्ये देखील या वृत्तीने त्यांना शांत बसू दिलं नाही. 



सुभाष पाटील यांनी जेलमध्येच ओपीडी सुरू केली. त्यांच्या चांगल्या वर्तणुकीमुळे 2006 मध्ये सुटका कपण्यात आलं. सुभाषला आपलं स्वप्न पूर्ण करण्याची हीच योग्य संधी मिळाली. त्यांनी चार वर्षांत एमबीबीएसचं शिक्षण पूर्ण केलं आणि 2019 मध्ये सुभाष पाटील हे डॉ. सुभाष पाटील झाले. त्यांनी एक वर्षाची इंटर्नशीपही पूर्ण केली असून आता ते पूर्णवेळ वैद्यकीय सेवेत रुजू झालेत.