जयपूर: राजस्थानमधील अलवर येथे गो तस्करीच्या नावाखाली जमावाने एकाला बेदम मारहाण केली. या मारहाणीत एका व्यक्तिचा जागिच मृत्यू झाला. अकबर खान असे मृत व्यक्तिचे नाव असून, तो मुळचा हरियाणाचा राज्यातील आहे. मृत व्यक्ती गाडीमधून दोन गायी घेऊन चालला होता. तेव्हा त्याच्यावर जमावाने हल्ला केला. अकबरचा मृतदेह मोर्चरी येथील रूग्णालयात शवविच्छेदनासाठी ठेवण्यात आला आहे. या घटनेमुळे मॉब लिंचिंगचा मद्दा पुन्हा एकाद चर्चेला आला आहे.


वसुंधरा राजेंनी दिले कारवाईचे आदेश


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्राप्त माहिती अशी की, मृत व्यक्ती हा खरोखरच गोतस्कर होता की, नाही याबाबत अद्याप कोणतीही माहिती पुढे आली नाही. त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहे. आम्ही आरोपींचा तपास करत असून, लवकरच त्यांना अटक करू, असे पोलिसांनी म्हटले आहे. तर, राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांनी म्हटले आहे की, अलवरमध्ये झालेल्या घटनेचा मी निशेध करते. पोलिसांनी गुन्हा नोंद केला असून, संशयीत व्यक्तिंचा तपास सुरू केला आहे. दोषींना कठोर शिक्षा होईल याची काळजी घ्यावी असेही मी आदेश दिल्याचे वसुंधरा राजे यांनी म्हटले आहे.





मॉब लिंचिंग?


दरम्यान, या घटनेमुळे मॉब लिंचिंगचा मद्दा पुन्हा एकाद चर्चेला आला आहे.