नवी दिल्ली : सांगनेर रेल्वे स्थानकावर काही वेळापूर्वी एक रेल्वे दुर्घटना झाली आहे. जबलपूर-अजमेर दयोदया एक्सप्रेसचे इंजिन आणि डब्बा पलटला आहे. या दुर्घटनेत सुदैवाने कोणत्याही प्रकारच्या जिवीत हानीचे वृत्त नाही. दयोदया एक्सप्रेस सांगानेर स्टेशन पासून पुढचे स्थानक असून तिथेच ही दुर्घटना झाली.  दुर्घटनेवेळी ट्रेनचा स्पीड जास्त नव्हता नाहीतर खूप मोठी दुर्घटना झाली असती. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रेल्वेचे डब्बे पटरीवर उतरल्यानंतर आजुबाजूच्या परिसरात खळबळ माजली. लोक डब्ब्यामध्ये अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यास आणि मदत करण्यास पुढे आहे. घटनास्थळी लोकांनी मोठ्या संख्येत गर्दी केली.  


दुर्घटनेचा काही वेळातच रेल्वे मार्गावर परिणाम झाला. काही रेल्वे रद्द करण्यात आल्या. ट्रेन ट्रॅकवरून घसरल्यानंतर आता बचावकार्य सुरू आहे आणि रेल्वे प्रशासन घटने मागील कारणांचा शोध घेत आहे. 


कोणत्याही प्रकराच्या सूचना आणि मदतीसाठी रेल्वेने हेल्पलाईन नंबर जारी केला आहे. यातील दुर्घटनाग्रस्तांना इतर मार्गाने त्यांच्या गंताव्य ठिकाणी सोडण्यात येत आहे.