जैसलमेर : जगात सर्वत्र कोरोनाने हाहाकार माजवला होता, सगळ्याच देशातील लोकं या महामारीला सामोरे गेले आहे. काही भागात कोरोना पहिल्या लाटेमध्ये पोहचला नाही, परंतु त्या भागात तो दुसऱ्या लाटेमध्ये पोहचला आणि अनेक लोकांना या विषाणूची लागण झाली आहे. पंरतु तु्म्हाला असे सांगितले की, जगाच्या पाठिवर एक असा भाग आहे, जिथे कोरोना अजून पोहचलाच नाही? आणि हे ठिकाण भारतातच आहे. तर तुमचा विश्वास बसेल? परंतु हे खरं आहे. राज्यस्थानमधील एकअसा भाग आहे, जिथे कोरोना आजूनही पोहलेला नाही. येथील एकाही व्यक्तीला कोरोनाची लागण झालेली नाही.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हा भाग पश्चिम राजस्थानमधील भारत-पाकिस्तान सीमेवर जैसलमेर जिल्ह्यात आहे. जैसलमेर जिल्ह्यापासून सुमारे 125 ते 250 कि.मी. अंतरावर असलेले शाहगड भाग अजूनही कोरोनाच्या विळख्यात आलेला नाही. शेकडो किलोमीटरच्या क्षेत्रात पसरलेल्या या भागाची लोकसंख्या सुमारे 10 हजार आहे. आतापर्यंत हा परिसर या साथीपासून पूर्णपणे सुरक्षित आहे.


येथील लोकांना कोरोनाची लागण का झाली नाही? यामागील कारण ऐकल्यानंतर तुम्हालाही आश्चर्य वाटेल. कारण, कोरोनाला रोखण्यासाठी, सरकारने ठरवलेल्या आवश्यक मार्गदर्शक तत्त्वांचे, या भागातील रहिवासी नैसर्गिकरित्या वर्षानुवर्षे अनुसरण करत आहेत.


कोरोनाच्या दुसर्‍या लाटेच्या दरम्यान जैसलमेर जिल्ह्याच्या दारापर्यंत येऊन पोहचला, त्याने येथील 206 पैकी 203 ग्रामपंचायतींमध्ये प्रवेश केला होता, परंतु तो शहागड आणि हरनाळपर्यंत पोहोचू शकला नाही. भौगोलिक परिस्थितीशिवाय हा वाळवंटी परिसर तेथील रहिवाशांच्या एकमेकांप्रती असलेले प्रेम आणि स्नेह यासाठी प्रसिद्ध आहे.



जिल्हा मुख्यालयापासून शेकडो किमी अंतरावर असलेल्या या परिसरात कोरोना न पोहोचण्याचे प्रमुख कारण म्हणजे, यांचा बाहेरील लोकांशी नसलेला संपर्क. जिल्ह्याच्या सीमावर्ती भागात दोन डझन ग्रामपंचायतींचा समावेश आहे. परंतु त्यांपैकी तीन ग्रामपंचायत या कोरोनापासून लांब आहेत. त्यामुळेच या ग्रामस्थांच्या जीवनशैलीचे कौतुक करण्यास प्रशासन देखील थकत नाही.


जैसलमेर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नारायणसिंह चरण म्हणाले की, "कोरोनाच्या दुसर्‍या लाटेमध्ये जिल्ह्यातील शहरे, गावात तसेच खेड्यातही कोरोना संक्रमणाचे रुग्ण आढळले आहेत. अशा परिस्थितीत शाहगड भागातील तीन ग्रामपंचायती लोकांसमोर उदाहरण म्हणून समोर आहेत. कोरोनाला लांब ठेवण्याच्या त्यांच्या या यशाबद्दल त्यांचे कौतुक केले पाहिजे."



या लोकांची घरे एकमेकांपासून खूप लांब आहेत. तसेच येथील लोकं अनावश्यकपणे फिरत नाहीत. या भागातील लोकांचे एक वेगळे जग आहे. त्यांमुळे इथल्या लोकांचा बाहेरील लोकांशी फारच कमी संपर्क असतो.


प्रामुख्याने पशुसंवर्धन करणाऱ्या या गावकऱ्यांचा बाह्य जगाशी फारसा संबंध नाही. निवडक लोकं आवश्यक वस्तू घेण्यासाठी सम, रामगड किंवा जैसलमेरच्या बाजारात येतात. ते जेव्हा बाजारात येतात तेव्हा ते इतरांसाठी ही खरेदी करतात. ज्यामुळे गावातील लोकांचा बाहेरील जगाशी फरसा संबंध येत नाही आणि हेच कारण आहे की, ते या कोरोनापासून लांब आहेत.