Jaishankar Security in Pakistan: भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर पाकिस्तानच्या दौऱ्यावर जाणार आहेत. 15-16 ऑक्टोबर रोजी पाकिस्तानमध्ये होणाऱ्या शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन (SCO) शिखर परिषदेत ते सहभागी होतील. या शिखर परिषदेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाकिस्तानकडून निमंत्रण मिळाले होते. मात्र भारत आणि पाकिस्तानमधील तणावपूर्ण संबंधांदरम्यान परराष्ट्र मंत्री एस जयशंकर हे शेजारील देशात जाऊन भारताचे प्रतिनिधित्व करणार आहेत. 


9 वर्षांनंतर पाकिस्तानात दौरा 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जयशंकर यांचा हा दौरा महत्त्वाचा मानला जातोय. कारण या दौऱ्याच्या निमित्ताने जवळपास 9 वर्षांनंतर भारतीय परराष्ट्र मंत्री पाकिस्तानला भेट देणार आहेत. पाकिस्तान आणि भारताचे संबंध नेहमीच तणावग्रस्त राहिले आहेत. पाकिस्तान हा भारताचा शत्रू देश मानला जातो. अशावेळी भारतीय परराष्ट्रमंत्र्यांचे संरक्षण कोण करणार? असा प्रश्न अनेकांना पडला असेल. याबद्दल जाणून घेऊया. 


यजमान देश असतो सुरक्षेसाठी जबाबदार


जेव्हा जेव्हा एखादा नेता दुसऱ्या देशात जातो तेव्हा एक विशेष सुरक्षा प्रोटोकॉल पाळला जातो. यासोबतच त्या नेत्यासोबत प्रवास करणाऱ्या शिष्टमंडळालाही सुरक्षा पुरवली जाते. या सुरक्षेची जबाबदारी यजमान देशाची असते. त्यामुळे पाकिस्तानमध्ये होणाऱ्या SCO शिखर परिषदेला उपस्थित राहणाऱ्या परदेशी नेत्यांच्या सुरक्षेची जबाबदारीही पाकिस्तानवर असेल.


जयशंकर यांच्यासोबत सुरक्षा कर्मचारी पाकिस्तानात जातील का?


परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांच्यासोबत भारतीय सुरक्षा कर्मचारीही पाकिस्तानला भेट देणार का, हा मोठा प्रश्न आहे. याचे उत्तर  नाही असे आहे. जेव्हा जेव्हा भारताचे परराष्ट्र मंत्री दुसऱ्या देशाला अधिकृत भेट देतात तेव्हा त्यांच्यासोबत एक शिष्टमंडळही जाते. यात परराष्ट्र मंत्रालयातील लोक सहभागी होतात. प्रत्येकाची सुरक्षा ही ते प्रवास करत असलेल्या देशाची जबाबदारी असते.


पाकिस्तानचे सैन्य पुरवेल सुरक्षा


शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन (SCO) शिखर परिषदेदरम्यान पाकिस्तानचे सैन्य परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांचे संरक्षण करतील. त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी पाकिस्तानी रेंजर्स आणि एसएसजी (स्पेशल सर्व्हिस ग्रुप) यांची असेल.


SSG किती धोकादायक?


भारतातील एनएसजी किंवा पॅरा एसएफ कमांडोप्रमाणेच एसएसजी ही पाकिस्तानची सर्वात धोकादायक फोर्स मानली जाते. ही फोर्स विशेष ऑपरेशनसाठी सज्ज असते. हे दल व्हीआयपी पाहुण्यांचे संरक्षण करण्यात आणि दहशतवादी हल्ल्यांना सामोरे जाण्यात माहिर आहे. यासोबतच पाकिस्तानच्या या दलाला आधुनिक शस्त्रे वापरण्याचे प्रशिक्षणही दिले जाते.


SSG प्रशिक्षण कसे केले जाते?


पाकिस्तानच्या सर्वात धोकादायक सैन्यांपैकी एक असलेल्या एसएसजीचे प्रशिक्षण खूप कठीण आहे. SSG मधून बाहेर पडणाऱ्यांचे प्रमाण 80-90 टक्के आहे. म्हणजेच 80 ते 90 टक्के लोक प्रशिक्षणादरम्यानच सोडून जातात. एसएसजी प्रशिक्षण 9 महिने चालते. ज्यामध्ये ते प्रत्येक परिस्थितीसाठी शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या तयार असतात. या दलांचे कमांडो नियमितपणे यूएस नेव्ही 'सील'मध्ये ट्रेनिंगसाठी पाठवले जातात.