जम्मू काश्मीर : जम्मू काश्मीरच्या शोपियाँ जिल्ह्यात सुरक्षा दलाच्या जवानांनी दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घातलंय. जवान आणि दहशतवाद्यांमध्ये दक्षिण काश्मीरमधील शोपियान जिल्ह्यात रेबन परिसरात चकमक उडाली. शोपियाँ जिल्ह्यातील रेबन परिसरात दहशतवादी लपून बसल्याची माहिती जवानांना सूत्रांकडून मिळाली होती. यानंतर जवानांनी शोधमोहीम राबवली. शोधमोहिमेदरम्यान जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक उडाली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


ओळख पटली 


एका पोलीस अधिकाऱ्यानं दिलेल्या माहितीनुसार, चकमकीनंतर घटनास्थळावरुन एक एके-४७ आणि पिस्तूल जप्त करण्यात आली आहे.



शिवाय, ठार करण्यात आलेल्या दहशतवाद्यांची ओळखही पटली आहे.


अलबदर नवाज आणि आदिल अशी ठार मारण्यात आलेल्या दहशतवाद्यांची नावं आहेत.