श्रीनगर : Jammu and Kashmir जम्मू काश्मीर येथे दोन वेगवेगळ्या कारवायांमध्ये एकूण ९ दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आल्याचं वृत्त समोर येत आहे. यामध्ये हिज्बुल मुजाहिद्दीनच्या तीन कमांडर्सचाही समावेश असल्याची माहिती मिळाली आहे. जम्मू काश्मीरच्या शोपियां प्रांतात ही कारवाई करण्याच आली असून, दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आल्याची अधिकृत माहिती पोलिसांकडून देण्यात आली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोमवारी सकाळी येथे चार दहशतवाद्यांना ठार करण्यात आलं. दक्षिण काश्मीरमधील पिंजोरा भागामध्ये संरक्षण दलात कार्यरत कर्मचाऱ्यावर गोळीबार करणाऱ्या या दहशतवाद्यांचा तेथेच खात्मा करण्यात आला. भारतीय लष्कर, सीआरपीएफ आणि जम्मू- काश्मीर पोलीसांना मिळून ही कारवाई केली. गुप्तचर यंत्रणांकडून या भागात दहशतवादी हालचाली पाहिल्या गेल्याची अधिकृत माहिती मिळताच संरक्षण यंत्रणांकडून लागलीच पावलं उचलली गेली. 


'शोपियांमध्ये पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास सुरु झालेल्या दहशतवादीविरोधी कारवाईमध्ये एकूण चार दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला', अशी माहिती विक्टर फोर्सचे जनरल कमांडिंग ऑफिसर मेजर जनरल ए. सेनगुप्ता यांनी एएनआयला दिली. 


पाहा : कौतुकास्पद! गर्भवती हरिणीला वाचवण्यासाठी जवानाची नदीत उडी


 


रेबान जिल्ह्यात पाच दहशतवाद्यांना जीवे मारण्याच्या कारवाईला चोवीस तासही उलटत नाहीत तोच या भागामध्ये आणखी एका कारवाईत या अतिरेकी कारवायांना वेसण घातलं गेलं. सध्याच्या घडीला सदर परिसरातील परिस्थिती नियंत्रणात आली असून, तेथील इंटरनेट व्यवस्थाही सुरु करण्यात येणार असल्याचं चिन्हं आहे.