श्रीनगर : जम्मू काश्मीरच्या अनंतनागमध्ये सुरक्षाबल आणि दहशतवाद्यांमध्ये सुरु असलेल्या चकमकीत दोन दहशतवाद्यांना ठार करण्यात यश आले आहे. या दरम्यान एक जवान शहीद तर एक जवान जखमी झाल्याचे वृत्त आहे. अनंतनागच्या बिजबहेरामधील मरहमा भागात ही चकमक सुरु आहे. सुरक्षाबलांद्वारे सुरु असलेल्या शोध मोहिमेमध्ये लपलेल्या दहशतवाद्यांनी समोरुन फायरिंग सुरु केली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


दक्षिण काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील अचबलमध्ये झालेल्या चकमकीत मेजर केतन शर्मा हे शहीद झाले आहेत. याच रॅंकचे दुसरे एक अधिकारी आणि दोन जवान जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे. जखमींना श्रीनगर येथील सेनेच्या 92 बेस रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. या चकमकीत अज्ञात दहशतवादी मारला गेल्याचे समोर येत आहे. त्याचा मृतदेह ताब्यात घेण्यात आला आहे. घटनास्थळावरून हत्यारे आणि दारुगोळा जप्त करण्यात आला आहे. तसेच दहशतवाद्याची ओळख पटवण्याचे काम सुरु आहे.



दहशतवाद्यांच्या उपस्थितीतीची गुप्त माहिती मिळाल्यानंर सुरक्षाबलाने सोमवारी सकाळी अचबल भागाला घेरले आणि शोध मोहीम सुरु केली. पण दहशतवाद्यांनी सुरक्षाबलावर फायरिंग सुरु केली. यानंतर दोघांमध्ये चकमक सुरु झाली.