जम्मू : मान्सूनने भारतात पावसाची वर्दी दिलेय. दक्षिण राज्यात चांगला पाऊस होत आहे. उत्तर भारतात काही ठिकाणी मान्सून पूर्व पाऊस कोसळला. तर मुंबईत काल जोरदार पाऊस पडला. पहिल्याच पावसात मुंबईकरांची धावपळ उडाली. पुढील ४८ तासाच जोरदार पावसाची शक्यता आहे. तर जम्मू आणि काश्मीरमध्ये आज जोरदार पाऊस कोसळला. काही ठिकाणी अतिवृष्ठी झाली. त्यामुळे येथील वातावरण अल्हादायक झालेय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

श्रीनगरमध्ये दुपारी काळे ढग आकाशात जमले होते. तसेच जोराचा वारा वाहत होता. काही तास मोठा पाऊस कोसळत होता. श्रीनगरमध्ये पर्यटकांनी पावसाचा आनंद लुटला. पावसामुळे येथील तापमान आणखी खाली घसरले. पर्यटक देखील या हंगामाचा आनंद घेत आहेत. हवामानातील बदलामुळे, दिवसाच्या शेवटी अंधार होता. रस्त्यावर धावणाऱ्या वाहनांना लाईट सुरु करुन गाड्या चालवाव्या लागत होत्या. अनेक ठिकाणी जोराचा वारा होता. तर काही भागात गारपीट झाली. हवामान खात्याने पुढील दोन ते तीन दिवस ढगाळ वातावरण आणि पावसाची शक्यता वर्तविली आहे.



पाऊस पडण्याआधी श्रीनगरमध्ये तापमान जास्त होते. पाऊस पडल्यानंतर या तापमानात घट झालेली पाहायला मिळाली. जम्मू-काश्मीरमध्ये प्रथमच ३४.४ डिग्री सेल्सिअस तापमान होते. पाऊस पडल्यानंतर या तापमानात घट झालेली पाहायला मिळाली. प्रथमच जास्त तापमानाची नोंद करण्यात आली होती.