काश्मिरात बर्फाची पांढरी चादर पसरलेय, पावसाची शक्यता
सध्या थंडीने सगळीचे राज्य गारठली आहेत. जम्मू-काश्मिरमध्ये तर बर्फ पडत असल्यामुळे, रस्त्यांवर पांढरी चादर पांघरल्यासारखं पाहायला मिळत आहे.
जम्मू : सध्या थंडीने सगळीचे राज्य गारठली आहेत. जम्मू-काश्मिरमध्ये तर बर्फ पडत असल्यामुळे, रस्त्यांवर पांढरी चादर पांघरल्यासारखं पाहायला मिळत आहे. जम्मू-काश्मिरच्या राजौरी इथे तर, बर्फ पडत असल्यामुळे, तिथले नागरिक घरात रहाणेच पसंत करत आहेत. गुलमर्ग, पेहलगाम, सोनमर्ग, तंगमार्ग आणि जवाहर बोगदा याठिकाणी मोठ्या प्रमाणावर बर्फवृष्टी होतेय. बर्फवृष्टीमुळे श्रीनगर-जम्मू राष्ट्रीय महामार्ग निसरडा झाल्यामुळे वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे.
श्रीनगरपासून 45 किलोमीटर अंतरावर काश्मीरमध्ये कड्याक्याची थंडी पडली आहे. या ठिकाणी चक्क एका झाडाला बर्फ लगडला आहे. हा वृक्ष गुलमर्गला जाणारा प्रत्येकाचा आकर्षण बनला आहे. येथील तापमान शून्याच्या खाली गेले आहे. गेले 24 तास येथील तापमान शून्याच्या खाली आहे. हवामानात अधिक बदल होण्याची शक्यता आहे. पाऊसही पडण्याची शक्यता आहे. येथील रात्रीचे तापमान उणे 12 पर्यंत खाली गेले आहे. तर दिवसाचे तापमान 4 ते 5 उणे आहे.
काश्मीरमध्ये गेल्या दोन आठवड्यांपासून तापमान सातत्याने खाली येत आहे. तलावाचे पाणी एकदम थंड झालेय. तर डोंगराळ भागात जेथे पाणी अद्याप आहे तेथे ते गोठले गेले आहे. हवामान खात्याने इशारा दिलाय, आगामी दिवसांत काश्मीरमध्ये हिमवर्षाव आणि पाऊस पडू शकतो. त्यामुळे थंडीत जास्त वाढ होण्याची शक्यता आहे.