मिनी बस दरीत कोसळून भीषण अपघात, 11 जणांनी गमवला जीव
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मृतांच्या कुटुंबियांना 2 लाख रुपयांची मदत
श्रीनगर: प्रवासी मिनी बसचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात 11 जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी असल्याची माहिती मिळाली आहे. मिनी बस दरीत कोसळून हा भीषम अपघात झाला आहे. या अपघाताची माहिती मिळताच पोलीस आणि आपात्कालीन पथक घटनास्थळी दाखल झाले. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या घटनेवर पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि जम्मू काश्मीरचे राज्यपाल यांनी दु:ख व्यक्त केला आहे.
जम्मू-काश्मीरच्या डोडा परिसरात मिनी बस दरीत कोसळून भीषण अपघात झाला. या अपघातात मिनी बसचं तर मोठं नुकसान झालं. याच सोबत 11 जणांनी जीव गमवला आहे. अॅम्ब्युलन्सच्या मदतीने जखमींना तातडीनं रुग्णालयात उपचारासाठी दाखल कऱण्यात आलं आहे. घटनास्थळावर बचावकार्य अद्याप सुरू असल्याची माहिती मिळाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, डोडा जिल्ह्यातील मछीपाल कहरा रोडवर हा अपघात झाला. दोडा येथून मिनी बस जात असताना बसचा तोल बिघडून ती दरीत कोसळली. अपघातानंतर परिसरात मोठा आरडाओरडा झाला. पोलिसांनी तातडीने घटनास्थळ गाठले आणि बचावकार्य सुरू केलं. या घटनेत 11 जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. मृतांचा आकडा वाढण्याची भीती अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मृतांच्या कुटुंबियांना 2 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. तर जखमींना 50 हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी देखील ट्वीट करून शोक व्यक्त केला आहे. ज्या दरीमध्ये ही मिनी बस कोसळली तिथून रेस्क्यू करण्यात अडथळे येत असल्याने एअरफोर्सची मदत घेण्यात आली आहे. त्यांच्या मदतीने जखमींना रेस्क्यू करण्यात आलं.