जम्मू-काश्मीर : पुलवामा (Pulwama) जिल्ह्यात पुन्हा एकदा दहशतवादी आणि जवानांमध्ये चकमक सुरु झाली आहे. कामराजीपोरा येथे बुधवारी पहाटे जवानांनी दोन दहशतवद्यांना घेरले. यातील एकाला ठार करण्यात यश आले असून एक भारतीय जवान शहीद झाला. तर दुसऱ्या दहशतवाद्याला भारतीय सैन्याने घेरले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जम्मू-कश्मीर (Jammu & Kashmir) मध्ये दहशतवादी आणि सुरक्षा दलांच्या दरम्यान झालेल्या चकमकीत एका दहशतवाद्याला ठार करण्यात यश आले आहे. भारतीय सैन्याने पुलवामा  (Pulwama) कामकाजीपोरा क्षेत्रातील सफरचंद बागेत लपलेल्या दोन दहशतवाद्यांना घेरले. त्यानंतर जोरदार फायरिंक करण्यात आली. भारतीय सैन्याच्या एन्काउंटरमध्ये एका दहशतवाद्या खात्मा झाला. बुधवार पहाटे दोन वाजेच्या सुमारास एन्काउंटर दरम्यान भारतीय सैन्यात एक जवान जखमी झाला. या जवानाला श्रीनगरच्या आर्मी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. उपचार सुरु असताना हा जवान शहीद झाला. त्याबरोबरच  आणखी एक जवान जखमी झाला असून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. उचार करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितले की, या जवानाची प्रकृती आता स्थिर आहे.




भारतीय सैन्याच्या जवानांनी चकमकीच्या ठिकाणाहून एक एके-४७ रायफल, हॅण्डग्रेनेड आणि अन्य घातपाताचा शस्त्रसाठा जप्त केला आहे. दहशतवादी लपलेल्या ठिकाणानाला जवानांनी वेढा घातला असून शोधमोहीम सुरु आहे.


तर दुसरीकडे पाकिस्तानकडून भारत-पाक सीमेवर गोळीबार करण्यात येत आहे. वारंवार शस्त्रसंधीच्या उल्लंघनाबरोबरच घुसखोरीचे देखील प्रयत्न केले जात आहेत. या अगोदर २९ जुलै रोजी राजौरीच्या नौशेरा सेक्टरमध्ये घुसखोरी करण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न भारतीय जवानांनी हाणून पाडला होता. त्यावेळी दोन पाकिस्तानी घुसखोरांचा खात्मा करण्यात आला होता. दरम्यान, उत्तर काश्मीरमधील केरन आणि मच्छल सेक्टर आणि राजौरीच्या कलला सेक्टरमध्ये पाकिस्तानकडून घुसखोरीचा प्रयत्न झाला होता. मात्र, त्या ठिकाणी तैनात असलेल्या जवानांनी हा प्रयत्न उधळून लावला.