नवी दिल्ली : अवघ्या काही दिवसांवर येऊ घातलेल्या बुद्ध पौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर भारताच्या काही भागांमद्ये सतक्रतेचा इशारा देण्यात आला आहे. दहशतवादी संघटना भारतात विविध ठिकाणी अतिशय मोठ्या स्वरुपाचे दहशतवादी हल्ले घडवण्याच्या तयारीत असल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांकडून देण्यात आली आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार नेपाळवाटे तीन दहशतवादी भारतातील जम्मू काश्मीर येथे असणाऱ्या बांदिपोरा या भागात दाखल झाले आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

साजिद मीर असं नाव असणाऱ्या एका दहशतवाद्याने तीन परदेशी दहशतवद्यांना शेजारी राष्ट्र नेपाळमधील काठमांडूवाटे बांदिपोरामध्ये घुसखोरी करत दाखल केलं. जेथे दहशतवाद्यांचे काही छुपे तळ असल्याचंही म्ह़टलं जातं. जैश-ए-मोहम्मद आणि लष्कर-ए-तोयबा या संघटनांच्या हालचाली येथे मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळतात. नेपाळमधून झालेल्या या घुसखोरीमुळे सध्या जम्मू- काश्मीर परिसरात सुरक्षा यंत्रणांमध्ये चिंता आणि तणावाचं वातावरण पाहायला मिळत आहे. 


बांग्लादेशमधील दहशतवादी संघटनाही सक्रिय 


एकिकडे नेपाळमधून झालेली दहशतवाद्यांची घुसखोरी अनेकांसाठी चिंतेचा विषय ठरत असतानाच दुसरीकडे बांग्लादेसमधूनही महत्त्वाची माहिती समोर येत आहे. तेथील जमात-उल-मुजाहिद्दीन (जेएमबी) या दहशतवादी संघटनेकडून महिला आत्मघातकी हल्लोखोराला तयार करण्यात आलं आहे. भारत, म्यानमार आणि बांग्लादेश येतील बुद्ध मंदिरांमध्ये या हल्लेखोरांकडून हल्ले घडवून आणण्याचा कट असल्याची माहिती मिळत आहे.