जम्मू काश्मीरमध्ये सर्च ऑपरेशन, दोन दहशतवाद्यांचा खात्मा
जम्मू काश्मीरच्या त्रालमध्ये दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले आहे. भारतीय जवान आणि जम्मू पोलिसांची संयुक्त कारवाई केली.
श्रीनगर : जम्मू काश्मीरच्या त्रालमध्ये दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले आहे. भारतीय जवान आणि जम्मू पोलिसांची संयुक्त कारवाई केली. परिसरात आणखी एक दहशतवादी लपून बसल्याची माहिती असून जोरदार सर्च ऑपरेशन जारी आहे.
जम्मू काश्मीर ही चकमक शनिवारी सकाळी त्राल येथील सतोरा येथे झाली. चकमक संपुष्टात आल्याचे सांगण्यात येते. मृतांमध्ये पाकिस्तानाचा एक दहशतवादी असल्याचेही सांगण्यात येत आहे.
जम्मू काश्मीरमध्ये गेल्या काही दिवसांपासून घुसखोरीचे आणि शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्याचे प्रकार वाढले आहेत. सर्जिकल स्ट्राइकनंतर असे प्रकार बंद होतील, असा अंदाज वर्तवण्यात आला होता. परंतु, गेल्या काही दिवसांपासून अशा घटनांमध्ये अधिकच वाढ झालेय.