श्रीनगर : जम्मू काश्मीरच्या किश्तवाडमध्ये आज सकाळी एक भीषण अपघात झाला आहे. केशवान भागात प्रवाशांना घेऊन जाणारी एक बस खोल दरीत कोसळली. या रस्ते अपघातात 31 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 20 हून अधिकजण जखमी आहेत. घटनास्थळी बचावकार्य दल पोहोचले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


केशवानहून ही बस किश्तवाड येथे चालली होती. सकाळी साधारण साडे सात वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. सिरगावरी जवळील एका खोल दरीत बस पडल्याचे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले. घटनास्थळावरून आतापर्यंत 20 मृतदेह हाती आले असल्याचे पोलीस महानिरीक्षक एम.के मिश्रा यांनी सांगितले. याआधी पोलीस अधिकाऱ्यांनी 24 जण ठार झाल्याची माहीती दिली होती. अद्याप बचाव कार्य सुरु आहे.