Terrorist Killed: जम्मू काश्मीरमध्ये भारतीय लष्कराला मोठे यश मिळाले आहे. अखनूर सेक्टरमध्ये घुसखोरीचा दहशतवाद्यांचा प्रयत्न  हाणून भारतीय सैन्याने हाणून पाडला आहे. लष्कराने 4 पाकिस्तानी दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. अखनूरमध्ये लष्कराची शोध मोहीम अजूनही सुरू आहे.भारतीय लष्कराला दहशतवाद्यांच्या लपण्याचा सुगावा लागला होता. त्यानंतर दहशतवाद्यांची शोध मोहीम तीव्र करण्यात आली. ड्रोन, हेलिकॉप्टर आणि स्निफर डॉगच्या मदतीने शोध मोहीम तीव्र करण्यात आली आहे. दहशतवादी हल्ल्याच्या अवघ्या 38 तासांनंतर मोठा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर राजौरीमध्ये लष्कराने तीन ते चार दहशतवाद्यांना घेरले होते. आता त्यांचा खात्मा करण्यात आल्याचे वृत्त समोर येत आहे. दरम्यान, राजौरी आणि पुंछमध्ये इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

20 डिसेंबरच्या संध्याकाळपासून राजौरीतील थानामंडी परिसरात सुरू असलेली कारवाई आज चौथ्या दिवशीही सुरू आहे. या भागात 2 ते 3 दहशतवादी लपून बसल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली होती, त्यानंतर ही कारवाई करण्यात आली. या कारवाईदरम्यान लष्कराच्या दोन वाहनांवर दहशतवाद्यांनी हल्ला केला, त्यानंतर लष्कराचे चार जवान शहीद झाले. या कारवाईत लष्कराचे तीन जवान जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, ड्रोन, हेलिकॉप्टर आणि स्निफर डॉगच्या मदतीने शोध मोहीम तीव्र करण्यात आली आहे.


जम्मू-काश्मीरच्या राजौरी आणि पूंछमध्ये दहशतवाद्यांच्या शोधासाठी सुरक्षा दलांची मोठी शोध मोहीम सलग तिसऱ्या दिवशीही सुरू आहे. हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांच्या अटकेनंतर राजौरी आणि पुंछमध्ये मोबाईल इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे.