जम्मू-काश्मीरच्या शोपियामध्ये चार बेपत्ता पोलिसांपैंकी तिघांचे मृतदेह हाती
एका ऑडिओमधून पोलिसांना नोकरी सोडण्याची धमकी दिली होती त्यानंतर...
श्रीनगर : जम्मू - काश्मीरच्या शोपिया भागात शुक्रवारी पहाटेपासून बेपत्ता असलेल्या तीन एसपीओ आणि एका कॉन्स्टेबलमधल्या तीन जणांचे मृतदेह सुरक्षादलाच्या हाती लागलेत. पोलीस बेपत्ता असल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षादलानं आणि पोलिसांनी संयुक्तपणे सर्च ऑपरेशन सुरू केलं होतं. त्यानंतर, वन गावातून दोन एसपीओ आणि एका कॉन्स्टेबलचा मृतदेह हाती लागलाय.
जम्मू-काश्मीरमध्ये अपहरण केलेल्या ३ पोलिसांचे मृतदेह सापडलेत. शोपियां भागात हे मृतदेह सापडलेत. मृतांमध्ये दोन विशेष पोलीस अधिकाऱ्यांचा तसंच निसार अहमद या पोलीस शिपायाचा समावेश आहे. हिजबुल मुजाहिद्दीनचा दहशतवादी रियाज नायकू या दहशतवाद्यानं काही दिवसांपूर्वी जम्मू काश्मीरमध्ये एका ऑडिओमधून पोलिसांना नोकरी सोडण्याची धमकी दिली होती. त्यानंतर गुरुवारी काश्मीरमधील चार पोलीस बेपत्ता झाले होते. या पोलिसांचं अपहरण केल्याचं उघड झालं असून त्यातील तिघांचे मृतदेह शोपियां इथं सापडलेत. यानंतर राज्यात तणावाची परिस्थिती निर्माण झालीय.
दरम्यान, जम्मू-काश्मीरच्या बांदीपोरामध्ये भारतीय जवानांनी दोन दहशतवाद्यांचा खात्मा केलाय.. या परिसरात आणखी काही दहशतवादी लपल्याची शक्यता आहे. त्यामुळे सुरक्षा दलानं शोधमोहीम सुरु केलीये.. गेल्या काही दिवसांपासून काश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांकडून पोलिसांना वारंवार टार्गेट केलं जातं.. या पार्श्वभूमीवर गुरुवारी रात्रीपासून शोपियान जिल्ह्यातून चार पोलीस कर्माची बेपत्ता झाल्याचीही माहिती समोर आलीये. यात दहशतवाद्यांचा हात असल्याचं बोललं जातंय.