Amarnath Yatra: तिथं काही दिवसांपूर्वीच जम्मू काश्मीरमध्ये एका बसवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या आठवणी ताज्या असताना इथे आणखी एका घटनेमुळं अनेकांचाच थरकाप उडाला. (Jammu Kashmir) जम्मू काश्मीरमध्ये नुकतीच अमरनाथ यात्रेची सुरुवात झाली असून, सध्या या यात्रामार्गावर अनेक प्रवाशांची वर्दळ पाहायला मिळत आहे. पण, याच यात्रामार्गावरील प्रवासाला गालबोट लागलं असून, नुकतीच एक दुर्दैवी घटना घडली. ज्यामध्ये अनेक प्रवासी गंभीररित्या जखमी झाले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मंगळवारी (2 जुलै 2024) रोजी अमरनाथ धामसाठी निघालेल्या प्रवाशांच्या बसला भीषण अपघाताला सामोरं जावं लागलं. अपघात भीषण स्वरुपाचा असला तरीही त्यामध्ये सुदैवानं कोणतीही जीवित हानी झाली नाही. मंगळवारी दुपारच्या सुमारास अमरनाथच्या दर्शनाहून पंजाबच्या दिशेनं निघालेल्या बसचे ब्रेक रामबन भागामध्ये फेल झाले. बसचे ब्रेक काम न करत असल्यामुळं हा प्रसंग मोठ्या अडचणीचा होता. पण, चालकाच्या समयसूचकतेमुळं मोठा अनर्थ टळला. 


जम्मू काश्मीरमधील रामबन येथे यात्रेकरुंच्या बसचे ब्रेक फेल झाल्याचं लक्षात येताच प्रवाशांमध्ये गोंधळ माजला. अनेक प्रवाशांनी जीव वाचवण्यासाठी धावत्या बसमधून उड्या मारल्या, ज्यामुळं ते गंभीररित्या जखमी झाले. सदर घटनेची माहिती संरक्षण दलाला मिळताच तातडीनं ही बस थांबवण्याचे प्रयत्न हाती घेत ही बस थांबवण्यात आली. 


हेसुद्धा वाचा : संतापजनक! गर्भवती माता, बालकांना देण्यात येणाऱ्या पोषण आहारात मृत साप 


अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार या बसमध्ये साधारण 40 प्रवासी प्रवास करत असून, ते मुळच्या पंजाबमधील होशियारपूर येथील रहिवासी होते. ही बस बनिहाल येथील नचलानापर्यंत पोहोचल्यानंतर तिचे ब्रेक फेल झाले. ज्यावेळी चालकानं प्रवाशांना यासंदर्भातील माहिती दिली तेव्हा त्यांच्यामध्ये प्रचंड गोंळध आणि भीतीचं वातावरण पाहायला मिळालं. जीव वाचवण्याच्या आवेगात काही प्रवाशांनी क्षणाचाही विचार न करता धावत्या बसबाहेर उड्या मारल्या. याणध्ये तीन महिला आणि एका लहान मुलासाही समावेश असून, या घटनेमध्ये आतापर्यंत 10 प्रवासी दुखापतग्रस्त झाल्याचं सांगण्यात आलं.



दरम्यान, ब्रेक निकामी झालेल्या या बससंदर्भातील माहिती मिळताच लष्कराच्या अधिकाऱ्यांनी पोलिसांच्या मदतीनं बसच्या चाकांखाली दगड फेकत बस थांबवण्याचा प्रयत्न करत तिला नदीच्या दिशेनं जाण्यापासून रोखलं. ज्यानंतर घटनास्थळी लगेचच लष्कराच्या रुग्णवाहिका दाखल झाल्या आणि जखमींना प्रथमोपचारासाठी रुग्णालयात पाठवण्यात आलं.