नवी दिल्ली : पाकिस्तानच्या कुरापती सुरुच असल्याचं पहायला मिळत आहे. शस्त्रसंधीचं उल्लंघन करत पाकिस्तानकडून गोळीबार करण्यात येत आहे. सीमारेषेवर कुरापती करणाऱ्या पाकिस्तानला भारतीय सैन्याने चोख प्रत्युत्तर दिलं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गेल्या चार दिवसांत सलग गोळीबार करणाऱ्या पाकिस्तानला बीएसएफने चोख प्रत्युत्तर देत १० पाकिस्तानी सैनिकांचा खात्मा केला आहे.


शनिवारी (२० जानेवारी) रोजी पुन्हा एकदा पाकिस्तानकडून भारतीय सैन्य दलाच्या चौक्यांना लक्ष्य केलं. 


शुक्रवारीही पाकिस्तानकडून जम्मू-काश्मीरमधील चार जिल्ह्यांत सीमारेषेवरील गावांना आणि भारतीय सैन्याच्या चौक्यांना लक्ष्य केलं. पाकिस्तानकडून करण्यात आलेल्या या गोळीबारात दोन जवान शहीद झाले होते आणि दोन नागरिकांचा मृत्यू झाला होता. तर, ३५ नागरिक जखमी झाले होते.


पाकिस्तानकडून सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास सुंदरबनी सेक्टरमध्ये अंदाधुंद गोळीबार केला. या गोळीबाराला भारतीय सैन्याने चोख प्रतुत्तर दिलं.