जम्मू-काश्मीर : काश्मीरच्या हंडवाडामध्ये दहशतवाद्यांबरोबर चकमक सुरु असून यात ४ जवान शहीद झाले आहेत. २१ दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. यात सीआरपीएफचे दोन जवान आणि जम्मू-काश्मीरचे दोन पोलीस शहीद झालेत, अशी प्राथमिक माहिती आहे. दरम्यान,तर कृष्णाघाटीमध्ये पाकिस्तानकडून पुन्हा शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले आहे. पाकिस्तानकडून कुरापत्या काढण्याचे काम सुरुच असल्याचे दिसून येत आहे. 



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चकमकीत दहशतवाद्यांचा खात्मा झाल्याचे वाटल्याने सुरक्षा दलातील जवान पुढे सरसावलेत. मात्र, पाडलेल्या घराच्या ढिगाऱ्यामधून उठून या दहशतवाद्यांनी गोळीबार सुरु केला असे सूत्रांनी सांगितले. सीआरपीएफच्या कमांडटसह आठ जण या चकमकीत जखमी झाले आहेत. तर आज सकाळी दोन दहशतवाद्यांचा चकमकीत ठार मारल्याचे सुरक्षा दलांकडून सांगण्यात आले.



दरम्यान, सीमा सुरक्षा दलाने एका संशयिताला अटक केलीय. पंजाबच्या फिरोजपूरजवळील भारतीय आऊटपोस्टजवळ ही कारवाई करण्यात आलीय. संशयिताकडून एक सीम कार्ड हस्तगत करण्यात आले आहे. हा नंबर तीन पाकिस्तानी व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये सहभागी असल्याचे स्पष्ट झाले आहे. याव्यतिरिक्त तीन मोबाईल फोनदेखील हस्तगत करण्यात आलेत. ही संशयित व्यक्ती उत्तर प्रदेशच्या मुरादाबादची असल्याची माहिती मिळत आहे.