Jammu Kashmir Bus Accident : जम्मू काश्मिरच्या डोडा जिल्ह्यात (Doda District) झालेल्या भीषण बस अपघातात (Bus Accident) 36 यात्रेकरुंचा मृत्यू झालाय. डोडा जिल्ह्यातल्या अस्सर भागात ही दुर्देवी घटना घडली. यात्रेकरुंना घेऊन जाणआरी बस खोल दरीत कोसळली. अपघाताची माहिती कळताच बचावपथक घटनास्थळी दाखल झालं आणि तात्काळ बचाव कार्य सुरु करण्यात आलं. या अपघातात 19 जण जखमी झालेत. सर्व जखमींना किश्तवाड आणि डोडा इथल्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी या दुर्घटनेबाबत दु:ख व्यक्त केलं आहे. पंतप्रधान निधीतून मृत व्यक्तींच्या कुटुंबियांना प्रत्येकी 2 लाख रुपये तर जखमींना 50 लाख रुपयांच्या मदतीची घोषणा करण्यात आली आहे. अपघातग्रस्त बसचा नंबर JK 02 CN 6555 असा आहे. ही बस बटोटे-किश्तवाड राष्ट्रीय महामार्गावर त्रुंगल-अस्सारजवळ बसचं घसरली आणि 300 फूच खोल दरीत कोसळली. 


जम्मू काश्मिरचे उपराज्यपाल मनोज सिन्हा यांनीही या घटनेवर दु:ख व्यक्त केलं आहे. जखमींना योग्य आणि चांगले उपचार मिळावेत अशा सूचनाही त्यांनी केल्या आहेत. याशिवाय नॅशनल कॉन्फ्रेन्सचे अध्यक्ष फारुख अब्दुल्ला आणि त्यांचे पूत्र उमर अब्दुल्ला यांनीही शोक व्यक्त केलं आहे. जखमींना आवश्यक ती सर्व मदत तात्काळ पुरवण्यात यावी अशी विनंती यांनी केली आहे. 


दरम्यान, गृहमंत्री अमित शहा यांनीही दुर्घटनेबाबत दु:ख व्यक्त केलं आहे. अपघातात जखमी झालेल्यां प्रवाशांची तब्येत लवकर सुधारावी अशी प्रार्थनाही त्यांनी केलीय.