नवी दिल्ली : जम्मू-काश्मीर पूनर्रचना विधेयक लोकसभेत मंजूर झालं आहे. ४३४ पैकी ३७० मतं या विधेयकाच्या बाजुने मतदान केलं. तर ७० खासदारांनी या विधेयकाच्या विरोधात मतदान केलं. लोकसभेत भाजपचे ३०३ खासदार आहेत. गृहमंत्री अमित शहा यांनी हे विधेयक आज लोकसभेत मांडलं होतं. त्यानंतर दिवसभरात या विधेयकावर चर्चा झाली. विविध पक्षाच्या नेत्यांनी यावर आपलं मत मांडलं. समाजवादी पक्षाने यावेळी लोकसभेतून वॉक आऊट केलं.



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोमवारी राज्यसभेत गृहमंत्री अमित शाह यांनी अनुच्छेद ३७० रद्द करण्याविषयीचा प्रस्ताव मांडला. ज्यानंतर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी अधिसूचना जारी करत ३७० रद्द करत असल्याचं जाहीर केलं. त्यानंतर हे विधेयक आज लोकसभेत सादर करण्यात आलं होतं. 


राज्यसभेत मांडल्या गेलेल्या या विधेयकानुसार जम्मू-काश्मीर या राज्याला दोन केंद्रशासित प्रदेशांमध्ये विभागण्यात आलं आहे. ज्यामध्ये जम्मू-काश्मीर या विधानसभा असणाऱ्या आणि लडाख या स्वतंत्र विधानसभा नसणाऱ्या केंद्रशासित प्रदेशांचा समावेश आहे.