श्रीनगर : सुरक्षादल आणि जम्मू-काश्मीर पोलिसांना दहशतवादाविरुद्ध मोठं यश हाती लागलंय, असं म्हणता येील. लष्कर-ए-तौयबाचा दहशतवादी निसार डार याला शुक्रवारी रात्री अटक करण्यात आलीय. सुरक्षादलाकडून दीर्घकाळापासून डार याचा शोध सुरू होता. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

निसार डार हा २३ वर्षांचा आहे. गेल्या काही वर्षांत घडवून आणण्यात आलेल्या दहशतवादी कारवायांमध्ये त्याचा हात आहे. सलीम पराय या लष्कर-ए-तोयबाच्या दहशतवाद्याच्या संपर्कात आला आणि दहशतवादी कारवायांमध्ये सक्रीय झाला.,


यापूर्वी एकदा निसार डार हा १२ नोव्हेंबर २०१९ रोजी एन्काऊंटर दरम्यान पळून जाण्यात यशस्वी झाला होता. या एन्काऊंटरमध्ये एक पाकिस्तानी दहशतवादी ठार झाला होता. 



सुरक्षादलाकडून मिळालेल्या माहितीनुसार, डार श्रीनगरमध्येच लपून बसला होता. सुरक्षा दलाच्या ठिकाणांवर हल्ले करण्याच्या योजना बनवण्यात मश्गूल असतानाच त्याला अटक करण्यात आलीय. यावेळी डार याच्याकडून मोठ्या प्रमाणात हत्यारंही जप्त करण्यात आलीत.