नवी दिल्ली : देशाच्या स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर संरक्षण यंत्रणांनी अतिशय सावधगिरीनं पावलं उचलल्याचं पाहायला मिळालं होतं. त्यानंतरच आता देशावर पुन्हा एकदा शत्रूची करडी नजर असल्याचं पाहायला मिळत आहे. सोमवारी जम्मू – काश्मीरमधील (Jammu Kashmir) सांबा क्षेत्रावर एक संशयास्पद ड्रोन घिरट्या घालताना दिसलं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सूत्रांच्या माहितीनुसार तीन विविध भागांमध्ये हे ड्रोन घोंगावताना दिसलं. सांबामधील विजयपूर, रामगड आणि गढवाल या भागांमध्ये या हालचाली पाहायला मिळाल्या.


ड्रोनच्या हालचाली दिसून येताच या भागात संरक्षण यंत्रणांनी शोधमोहिम हाती घेतली. याबाबतची सविस्तर माहिती अद्यापही प्रतिक्षेत आहे.


सोमवारी जम्मू काश्मीरमधील कुपवाडा येथे झालेल्या ग्रेनेड हल्ल्यात सीआरपीएफ जवान जखमी झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी ड्रोन दिसून आल्याची घटना घडली. दुसऱ्या घटनेमध्ये आझाद गंज भागात दहशतवाद्यांनी पोलीस पथकावर ग्रेनेड हल्ला केल्याचं दिसून आलं होतं. या दोन्ही घटनांमध्ये कोणाचाही मृत्यू झाला नसल्याची माहिती समोर आली आहे.


दरम्यान, अफगाणिस्तानमध्ये तालिबाननं वर्चस्व प्रस्थापित केलेलं असतानाच भारतामध्ये अतिसंवेदनशील भागांत ड्रोनच्या संशयास्पद हालचाली चिंता वाढवणाऱ्या असल्यामुळं सुरक्षा यंत्रणा अधिकत सतर्क झाल्या आहेत.