काश्मीरमध्ये लष्कर-ए-तोयबाच्या ३ दहशतवाद्यांचा खात्मा
काश्मीरच्या सोपोर येथे लष्करी जवान आणि जम्मू-काश्मीर पोलिसांच्या संयुक्त कारवाईत `लष्कर-ए-तोयबा`च्या तीन दहशतवाद्यांना ठार करण्यात यश आले आहे.
जम्मू : काश्मीरच्या सोपोर येथे लष्करी जवान आणि जम्मू-काश्मीर पोलिसांच्या संयुक्त कारवाईत 'लष्कर-ए-तोयबा'च्या तीन दहशतवाद्यांना ठार करण्यात यश आले आहे.
दहशतवाद्यांकडून तीन एके-४७ बंदुका आणि दारुगोळा हस्तगत करण्यात आला आहे. चकमकीत एक जवान जखमी झाल्याचीही माहिती आहे. काश्मीरच्या उत्तरेला बारामुल्ला जिल्ह्यात सोपोर येथे दहशतवादी दडून बसल्याची माहिती मिळाल्यानंतर शनिवारी पहाटे साडेचार वाजता सीआरपीएफची १७९ बटालियन, ५२ राष्ट्रीय रायफल दल आणि पोलिसांच्या मदतीने शोधमोहीम सुरु होती.
एएनआय वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार भारतीय जवानांनी दहशतवाद्यांचा शोध घेत तिघांना ठार केले. या चकमकीनंतर जिल्ह्यातील इंटरनेट सेवा बंद करण्यात आलेय. तसेच सोपोरमधील शाळा आणि महाविद्यालयांनाही सुटी देण्यात आली आहे.