जवानांच्या ताफ्यावर आत्मघाती हल्ला करणारा कोण होता आदिल डार
जवानांच्या ताफ्याला स्फोटकांनी उडवणारा आदिल डार 2018 साली जैश ए मोहम्मदमध्ये सामिल झाला होता.
नवी दिल्ली - काश्मीरमधील पुलवामात दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात 44 जवान शहीद झाले. जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेकडून हा दहशतवादी हल्ला करण्यात आला. जैश ए मोहम्मदच्या आत्मघातकी हल्ल्यामध्ये हल्लेखोरांनी काश्मीरमध्ये सीआरपीएफच्या बसला स्फोटकांनी भरलेल्या स्वत:च्या गाडीने ठोकर दिली. जवानांच्या बसला स्फोटकांनी उडवणारा आदिल अहमद डार जैश ए मोहम्मदचा दहशतवादी होता. आदिल डार हा पुलवामातील राहणार होता. अमेरिकेने अफगाणिस्तानमधून आपली फौज पुन्हा बोलवली असल्याच्या अमेरिकेच्या घोषणेला तालिबानने आपला विजय झाला असल्याचे जगासमोर सांगितले आणि याच घटनेने आदिलला आत्मघाती दहशतवादी बनण्यासाठी प्रेरित केले.
पुलवामातील हल्ल्यानंतर आदिल डारचा फोटो आणि एक व्हिडिओ व्हायरल होत होता. पुलवामातील काकापोरा येथे राहणाऱ्या 21 वर्षीय आदिल डारने जवानांच्या गाडीला स्फोट घटवून आणला. आदिल डार 2018 साली जैश ए मोहम्मदमध्ये सामील झाला होता. हल्ल्याच्या काही दिवस आधी एका सर्च ऑपरेशनदरम्यान सुरक्षारक्षकांकडून आदिल डारला घेराव घालण्यात आला होता. परंतु त्याने तिथून पळ काढला होता. जैश ए मोहम्मदने हल्ल्यापूर्वी आदिल डारचा एक व्हिडिओ जाहीर केला होता. या व्हिडिओला हल्ल्याच्या आधीच शूट करण्यात आले होते. व्हिडिओत आदिलने हा त्याचा शेवटचा व्हि़डिओ असल्याचे सांगितले. त्याने आपल्या मित्रांना दहशतवाच्या मार्गावर चालण्याचे आव्हानही केले आहे.
सीआरपीएफच्या जवानांचा ताफा श्रीनगरहून जम्मूच्या दिशेने जात होता. यात 2500 जवानांचा समावेश होता. या मार्गावरील एका कारमध्ये दहशतवाद्यांनी आयईडी स्फोटकांचा साठा ठेवला होता. सीआरपीएफच्या वाहनांचा ताफा जवळ आल्यानंतर दहशतवाद्यांनी स्फोट घडवून आणला. आयईडी स्फोटानंतर गोळीबाराचेही आवाज येत होते. या हल्ल्यानंतर जम्मू-काश्मीरमधील सुरक्षाव्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे. जम्मूमधील मोबाईल इंटरनेट सेवाही बंद करण्यात आली आहे.