मुंबई : जम्मू काश्मीरमध्ये पुन्हा एकदा धुमश्चक्री पाहायला मिळाली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लष्करी जवान आणि दहशतवाद्यांमध्ये सकाळी जोरदार चकमक झाली. या चकमकीत एका दहशतवाद्याला कंठस्नान घालण्यात लष्कराच्या जवानांना यश आलंय. बारामुल्लातील लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेचा शफअत वाणीचा खात्मा करण्यात आलाय. या मृत दहशतवाद्याकडून पोलिसांनी एके-47, दोन ग्रेनेड आणि इतर शस्त्रसाठा जप्त केलाय. 



त्याआधी शनिवारी अनंतनाग येथे झालेल्या चकमकीत लष्कराने दोन दहशतवाद्यांना ठार केले होते. त्यांच्याकडून एके-47 सह अनेक शस्त्रास्त्रे जप्त करण्यात आली होती. दरम्यान, ठार करण्यात आलेल्या दहशतवाद्यांची ओळख पटली नव्हती. जम्मू-काश्मीरमधील दहशतवाद्यांच्या नायनाटासाठी लष्कराने गेल्यावर्षीपासून ऑपरेशन ऑल आऊट सुरू केले आहे. या कारवाईंतर्गत आतापर्यंत दोनशेहून अधिक मोठ्या कमांडरसह दोनशेहून अधिक दहशतवाद्यांना लष्कराने कंठस्नान घातले आहे.