दिल्ली : तुम्ही जमातारा टोळीचे नाव ऐकले असेल. ही तिच टोळी आहे, जे लोकांना स्वत: बँकेतून बोलत असल्याचे सांगतात आणि लोकांना बँक डिटेल्स घेऊन बँक अकाऊंटमधून ऑनलाईन पैसे काढून फसवणूक करतात. आत्तापर्यंत ही टोळी लोकांना त्यांचे बँक खाते ब्लॉक झाले, असल्याचे कारण देऊन त्यांच्याकडून पैसे काढत होते. परंतु आता कोरोनाकाळात या टोळीने लोकांना लुटण्याची नवीन पद्धत शोधून काढली आहे. आता ही टोळी ऑक्सिजन सिलिंडर आणि रेमडेसिवीर सारख्या अत्यावशक गोष्टींच्या नावाखाली लोकांची फसवणूक करत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दिल्लीतील करोल बाग पोलिस ठाण्यात 4 दरोडेखोरांना या आरोपाखाली अटक केली आहे, यांनी ऑक्सिजन सिलिंडर आणि इंजेक्शनच्या नावाखाली लोकांची फसवणूक केली आहे.


20 बँक खाते जप्त


या टोळीने लोकांना लुटण्यासाठी ऑनलाईन माध्यम वापरले आहे. या टोळीने ऑक्सिजन सिलिंडर आणि  रेमडेसिवीर खरेदी करण्यासाठी ऑनलाइन जाहिरात दिली होती. गरजेच्या वेळी जेव्हा लोकं अशी जाहिरात पाहायचे, तेव्हा जास्त विचार न करता त्यांना फोन करायचे.


ही टोळी लोकांना ऑनलाईन डीलिव्हरीच्या माध्यमातून ऑक्सिजन सिलिंडर आणि रेमडेसिवीर घरपोच देऊ असे सांगून त्यांना पैसे भरण्यास भाग पाडत आणि लोकांकडून मोठ्या प्रमाणात पैसे लूटत आहे.


पोलिसांनी आतापर्यंत चार आरोपींना या गुन्ह्याखाली अटक केले आहे. ही टोळी झारखंडमधील जामतारा येथून काम करायची. सध्या पोलिसांनी यांची 22 बँक खाती जप्त केली आहेत, तर आरोपींकडून 20 हून अधिक सिम जप्त करण्यात आले आहेत. पुढील तपास पोलिसांचा सुरू आहे.