मुंबई : केंद्र सरकारने प्रधानमंत्री जन-धन योजना (JanDhan Account) ऑगस्ट 2014 मध्ये सुरू केली. त्याचा हेतू दुर्बल घटकातील लोकांना बँकिंग सेवांशी जोडणे आहे. देशातील प्रत्येक प्रौढ नागरिकाचे किमान एक बँक खाते असले पाहिजे, असे लक्ष्य सरकारने ठेवले आहे. प्रधानमंत्री जन-धन योजनेअंतर्गत 43 कोटी खातेधारकांना जीवन विमा आणि अपघात संरक्षण होत आहे. Money9 च्या अहवालानुसार, प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना (PMJJBY) आणि प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना (PMSBY) या PMJDY अंतर्गत समाविष्ट करण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जन धन बँक खात्यांमध्ये काही विशेष सुविधा देखील उपलब्ध आहेत. या योजनेअंतर्गत एक मोठा फायदा म्हणजे खातेदारांना मोफत अपघाती विमा संरक्षण उपलब्ध आहे. कठीण काळात हे खातेदारांसाठी खूप उपयुक्त आहे. 
जन धन खातेधारकांना 2 लाख रुपयांचा अपघात विमा आणि 30 हजार रुपयांचा सामान्य विमा मोफत दिला जातो. म्हणजेच, खातेदाराला या योजनेत 2.30 लाख रुपयांचा मोफत लाभ मिळतो.


पूर्वी लोकांना या खात्याअंतर्गत कमी अपघाती संरक्षण मिळत होते. म्हणजे ज्यांनी 28 ऑगस्टला किंवा त्यापूर्वी जन धन खाती उघडली आहेत त्यांना 1 लाख रुपयांचे अपघाती संरक्षण मिळत आहे. परंतु 28 ऑगस्ट 2018 पासून खातेधारकांना 2 लाख रुपयांचे अपघाती विमा संरक्षण मिळू लागले आहे.


प्रधानमंत्री जनधन योजनेअंतर्गत खातेदारांना RuPay डेबिट कार्डही मोफत मिळते. 2018 मध्ये केंद्र सरकारने RuPay योजनेअंतर्गत जन धन खातेधारकांना दिलेले अपघाती विमा संरक्षण वाढवले ​​होते.


PMJDY अंतर्गत काही महत्त्वाच्या गोष्टींचीही काळजी घ्यावी लागते. जन धन खात्यांअंतर्गत उपलब्ध वैयक्तिक अपघाती विमा संरक्षण तेव्हाच उपलब्ध असेल जेव्हा RuPay कार्ड धारकाने अपघाताच्या तारखेपासून 90 दिवसांच्या आत किमान एक यशस्वी व्यवहार केला असेल. या 90 दिवसांमध्ये अपघाताची तारीखही समाविष्ट केली आहे.


जर तुम्हाला तुमचे नवीन जन धन खाते उघडायचे असेल, तर तुम्ही जवळच्या बँक शाखेला भेट देऊ ते खोलू शकता. फॉर्ममध्ये तुम्हाला तुमचे नाव, मोबाईल नंबर, पत्ता, व्यवसाय / रोजगार, वार्षिक उत्पन्न, आश्रितांची संख्या, नॉमीनी इत्यादी द्यावे लागतील.


10 वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त वयाची कोणतीही व्यक्ती हे खाते उघडू शकते. KYCची आवश्यकता पूर्ण करणारी कागदपत्रे आधार कार्ड, पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्ससह सबमिट केली जाऊ शकतात.


जर तुमच्याकडे कागदपत्रे नसतील, तर तुम्ही लहान खाते उघडू शकता. यामध्ये तुम्हाला बँक अधिकाऱ्यासमोर सेल्फ-अटेस्टेड फोटो आणि तुमची सही करावी लागेल. जन धन खाते उघडण्यासाठी तुम्हाला कोणत्याही प्रकारचे शुल्क भरावे लागणार नाही.