Janmashtami 2022: आज देशभरात कृष्ण जन्माष्टमीचा उत्साह पाहायला मिळत आहे. आज मध्यरात्री 12 वाजता श्रीकृष्ण जन्मोत्सव साजरा केला जाईल. श्रीकृष्ण जन्माष्टमी श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमीला झाला होता. हिंदू पौराणिक कथेनुसार श्रीकृष्ण भगवान विष्णू यांचे आठवा अवतार होते. या सणानिमित्त भगवान श्रीकृष्ण यांना आवडत्या वस्तू अर्पित केल्या जातात. पण तुमच्या माहितीसाठी श्रीकृष्ण जन्मोत्सव जगातील इतर देशातही धुमधडाक्यात साजरा केला जातो. इतकंच नाही तर सार्वजनिक सुट्टी देखील असते. मुस्लिमबहुल शेजारी राष्ट्र असलेल्या बांगलादेश जन्माष्टमीचा उत्साह असतो. या दिवशी बांग्लादेशमध्ये सार्वजनिक सुट्टी असते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ढाका शहरातील ढाकेश्वरी मंदिरापासून एक विशेष मिरवणूक सुरू होते आणि शहराच्या जुन्या भागातून जाते. ही मिरवणूक 1902 ते 1948 या कालावधीत दरवर्षी निघत होती, परंतु बांग्लादेश पहिल्यांदा मुस्लिम राजवटीत आल्यावर ती रद्द करण्यात आली होती. तथापि, 1989 मध्ये पुन्हा सुरू करण्यात आली. दुसरीकडे, जगभरात इस्कॉनची सध्या  50,000 हून अधिक मंदिरे आणि केंद्रे आहेत. आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, उत्तर आणि दक्षिण अमेरिका, बेल्जियम, युरोप, नेपाळ यासह विविध देशांमध्ये इस्कॉनची अनेक केंद्रे आहेत. इस्कॉनची ही चळवळ 'हरे कृष्ण चळवळ' म्हणून जगभर ओळखली जाते.


भगवान श्रीकृष्णाची 108 नावे आहेत, ज्यामध्ये गोपाळ, गोविंद, देवकीनंदन, मोहन, श्याम, घनश्याम, हरी, गिरधारी, बांके बिहारी खूप प्रसिद्ध आहेत. मथुरेत बांके बिहारी नावाचे मोठे मंदिर आहे, जिथे दररोज हजारो भाविक दर्शनासाठी येतात. पौराणिक कथेनुसार, भगवान श्रीकृष्णाने 16,100 स्त्रियांना नरकासुर नावाच्या दुष्ट आत्म्याच्या तावडीतून वाचवले होते. जेव्हा त्या महिला त्यांच्या घरी परतल्या तेव्हा त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांना स्वीकारले नाही. म्हणून भगवान श्रीकृष्णाने आपल्या सन्मानाचे रक्षण करण्यासाठी त्या सर्वांशी विवाह केला.