Japan Earthquake: जपान एकापाठोपाठ सलग दोनदा भूकंपाच्या धक्क्याने हादरला आहे. पहिल्या भूकंपाची तीव्रता 6.5 रीश्टर स्केल आणि दुसऱ्या भूकंपाची तीव्रता 5.0 रीश्टर स्केल इतकी मोजण्यात आली आहे. युनायटेड स्टेट्स जियोलॉजिकल सर्व्हेने दिलेल्या माहितीनुसार, भूकंपाचा पहिला झटका गुरुवारी कुरील द्विपवर दुपारी 2.45 मिनिटांनी जाणवला तर दुसरा धक्का दुपारी 3.07 मिनिटांनी जाणवला आहे. सततच्या भूकंपाच्या धक्क्याने जपानमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रिपोर्ट्सनुसार, जपामध्ये गेल्या तीन दिवसांपासून भूकंपाचे तीव्र धक्के जाणवले आहेत. यापूर्वी 26 आणि 27 डिसेंबरला देखील जपानमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले होते. 26 डिसेंबर रोजी जपानच्या इजू आयलँड येथे तर, 27 डिसेंबर रोजी होक्काइडो येथे भूकंपाचे झटके जाणवले होते. तर, आत 28 डिसेंबर रोजी जपानमधील कुरिल बेटांवर गुरुवारी दोनदा भूकंपाचा धक्का नोंदवण्यात आला होता. जपानच्या किनारी भागात भूकंपाचे धक्के जाणवल्याने नागरिकांमध्ये भीती व्यक्त करण्यात येत आहे. 


जगातील सर्वात जास्त भूकंपाचे धक्के जपानमध्येच जाणवतात. जपानमध्ये 2011 साली आलेल्या भूकंपाने सर्व उद्ध्वस्त केले होते. त्सुनामीमुळं जपानच्या उत्तरी भागात मोठा विध्वंस झाला होता. आत्ताच तीन दिवसांत जपानमध्ये तीनदा भूकंपाचा धक्का जाणवला आहे. 



भूकंपाची तीव्रता कशी मोजली जाते


भूकंप किती विध्वसंक आहे हे रिश्टर स्केलवर मापले जाते.  जाणून घेऊया भूकंपाची तीव्रता कशी मोजली जाते. 


0 ते 1.9 तीव्रता असलेल्या भूकंपाबाबत सीज्मोग्राफमुळं कळते


2-2.9 तीव्रतेच्या भूकंपामुळं धरतीचे हलके कंपन होते.


3-3.9 तीव्रतेच्या भूकंपाची जाणीव अशी होते जणूकाही खूप जवळून ट्रक गेला आहे. 


4-4.9 तीव्रतेच्या भूकंपामुळं खिडक्या तुटू शकतात किंवा भिंतीवर लटकवलेल्या फ्रेम खाली पडू शकतात


5 ते 5.9 तीव्रतेच्या भूकंपामुळं घरातील फर्निचर हलू शकते. 


6 ते 6.9 तीव्रतेच्या भूकंपामुळं इमारतीना धोका असतो वरच्या मजल्याचे नुकसान होऊ शकते


7 ते 7.9 तीव्रतेच्या भूकंपामुळं इमारत कोसळू शकते. जमीनीच्या आतील पाइप फाटू शकतो


8 ते 8.9 तीव्रतेच्या भूकंपामुळं इमारतीसोबतच मोठे-मोठे पुल कोसळू शकतात. 


9 ते त्यापेक्षा जास्त भूकंपेच्या तीव्रतेमुळं विध्वंस होऊ शकतो. एखादा व्यक्ती मैदानात उभा असेल तर धरणीकंप होताना दिसू शकतो. तसंच, समुद्राजवळ भूकंप झाला तर त्सुनामी येऊ शकते.