Japanese Woman Harrased on Holi: दिल्लीमध्ये (Delhi) होळी (Holi) साजरी करता रंग लावण्याच्या बहाण्याने तरुणांनी गैरवर्तन केल्यानंतर पीडित जपानी महिलेने (Japanese Woman Harrassed) पहिल्यांदाच या घटनेवर भाष्य केलं आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल (Vira Video) झाल्यानंतर संपूर्ण देशभरातून संताप व्यक्त होत आहे. यादरम्यान महिलेने आपल्या ट्विटरवरुन (Twitter) हा व्हिडीओ डिलीट केला असून, त्या दिवशी नेमकं काय झालं होतं हा संपूर्ण घटनाक्रम सांगितला आहे. महिलेने एकामागून एक अनेक ट्वीट केले आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महिलेने ही घटना दुर्दैवी असल्याचं सांगताना आपण आपल्या 35 मित्रांसह हा सण साजरा करण्यासाठी सहभागी झालो होतो अशी माहिती दिली आहे. "होळी सण साजरा करताना एकट्या महिलेने बाहेर पडणं सुरक्षित नसल्याचं मी ऐकलं होतं. यामुळे मी हा सण साजरा करण्यासाठी आपल्या 35 मित्रांसह सहभागी झाले होते. पण दुर्दैवाने ही घटना घडली," अशी माहिती महिलेने दिली आहे. 


सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओत काही तरुणांनी महिलेला घेरल्याचं दिसत आहे. यावेळी तरुण महिलेला जबरदस्ती रंग लावत असून, यावेळी एकाने तिच्या डोक्यावर अंड फोडल्याचं दिसत आहे. तसंच व्हिडीओच्या शेवटी एक तरुण चुकीच्या पद्धतीने स्पर्श करत असताना ती त्याच्या कानाखाली लगावतानाही दिसत आहे. हा व्हिडीओ पहाडगंज परिसरातील आहे.



महिलेने गुरुवारी या घटनेचा व्हिडीओ शेअर केला होता. पण नंतर तिने लगेच हा डिलीटही करुन टाकला. या व्हिडीओवर आलेल्या प्रतिक्रिया पाहून आपल्याला धक्का बसला आणि त्यामुळे ते ट्विट डिलीट केलं असं महिलेने सांगितलं आहे. "9 मार्चला मी होळीचा एक व्हिडीओ ट्वीट केला होता. यानंतर मला इतके रिट्वीट आणि मेसेज आले ज्याची मी कल्पनाही केली नव्हती. घाबरल्याने मी ते ट्वीट डिलीट केलं," असं महिलेने सांगितलं आहे. 



दरम्यान महिलेने ट्विटरमध्ये भारताप्रती आपलं प्रेम व्यक्त केलं आहे. तिने म्हटलं आहे की "मला भारताबद्दल सर्व काही आवडतं. मी भारतात अनेकदा आले असून, हा एक आकर्षक देश आहे. भारत आणि जपान नेहमीच एकमेकांचे मित्र राहतील".


महिलेने याप्रकरणी अद्याप कोणतीही पोलीस तक्रार केलेली नाही. मात्र पोलिसांनी या व्हिडीओची दखल घेत तीन आरोपींना ताब्यात घेतलं आहे. यामधील एक आरोपी अल्पवयीन आहे. हे सर्वजण पहाडगंडचे रहिवासी असून त्यांनी आपला गुन्हा कबूल केला आहे. "पोलिसांनी कडक कारवाईचं आश्वासन दिलं असून, महिलांविरोधातील गुन्ह्यांचे प्रमाण कमी होईल अशी आशा आहे," असं महिलेने म्हटलं आहे. दरम्यान संबंधित महिलेने भारत देश सोडला असून सध्या बांगलादेशात आहे.