जावेद अख्तर कट्टरवाद्यांवर संतापले...
संसदेत भारत माता की जय बोलणारे गीतकार जावेद अख्तर यांनी कट्टरवाद्यांना खडेबोल सुनावले आहे. जावेद अख्तर यांनी धर्मनिरपेक्षता आणि धर्मनिरपेक्ष संविधानाचा विरोध करणाऱ्यांना टीकेचे लक्ष केले आहे.
नवी दिल्ली : संसदेत भारत माता की जय बोलणारे गीतकार जावेद अख्तर यांनी कट्टरवाद्यांना खडेबोल सुनावले आहे. जावेद अख्तर यांनी धर्मनिरपेक्षता आणि धर्मनिरपेक्ष संविधानाचा विरोध करणाऱ्यांना टीकेचे लक्ष केले आहे.
इतक्या वर्षांपासून तुम्ही धर्मनिरपेक्षता आणि धर्मनिरपेक्ष संविधानावर नाखुश होतात, तर इतर देशात का गेला नाहीत, असा सवाल जावेद अख्तरने कट्टरवादी विचार मानणाऱ्या आणि भारताच्या धर्मनिरपेक्षतेवर प्रश्न चिन्ह उपस्थित करणाऱ्यांना विचारला आहे.
दरम्यान, जावेद अख्तर यांनी ट्विट करून हे वक्तव्य केले आहे. पण त्यांच्या ट्विटमध्ये कोणत्याही नेत्याला टार्गेट करण्यात आलेले नाही. त्यांच्या ट्विटच्या कमेंटमध्ये एका युजर्सने माजी उपराष्ट्रपती हामिद अन्सारी यांच्या इशाऱ्यावर प्रश्न उपस्थित केला होता. त्यावर जावेद अख्तर म्हणाले, हामिद अन्सारी सच्चे देशभक्त आहेत. तो आपल्या समाजातील काही अनपेक्षित घटनांमुळे चिंतीत आहेत.
माजी उपराष्ट्रपती हामीद अन्सारी यांनी आपल्या अखेरच्या भाषणात म्हटले होते की देशातील मुस्लीम अस्वस्थ आणि असुरक्षित असल्याचे भावना आहे.