अरूणाचल प्रदेशात तैनात जवानाचे कुटुंबिय 27 दिवसांपासून बेपत्ता
अरुणाचल सीमेवर तैनात असलेल्या भारतीय सैन्यातील जवान अनिल गोंडगे यांनी आज विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्यासह मुख्यमंत्र्यांची भेट घेतली.
गुवाहाटी : अरुणाचल सीमेवर तैनात असलेल्या भारतीय सैन्यातील जवान अनिल गोंडगे यांनी आज विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्यासह मुख्यमंत्र्यांची भेट घेतली.
गोंडगे यांच्या पत्नी स्वप्ना आणि मुलगी आरा मागील २७ दिवसांपासून अरुणाचल येथून बेपत्ता आहेत. गोंडगे हे मुळचे परभणी जिल्ह्यातील आहेत. त्यामुळे स्थानिक पोलीस याप्रकरणी सहकार्य करत नसल्याचा गोंडगे यांचा आरोप आहे.
मुख्यमंत्र्यांनी याप्रकरणी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क करून सहकार्य करण्याची विनंती केली आहे.