नवी दिल्ली : जावेद हबीब यांचे जगभरात चाहते आहेत. त्यांच्याकडे हेअरस्टाईल असो किंवा हेअर कट शिकण्यासाठी हजारो मुलं अॅडमिशन घेतात. तसंच अनेकजण त्यांच्याकडे हेअरकट किंवा हेअरस्टाइलसाठी जातात. आपल्या वेगवेगळ्या हटके हेअरस्टाईलनं जावेद हबीब खूप जास्त प्रसिद्ध आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सध्या सोशल मीडियावर जावेद हबीब यांचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमुळे वादही निर्माण झाला आहे. त्यामुळे जावेद हबीब अडचणीत सापडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की ते एक महिलेचा हेअरकट करत आहेत. 


हेअरकट करताना महिलेच्या डोक्यावर जावेद हबीब थुंकला. त्यानंतर त्याने हेअरकट केला. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगानं व्हायरल होत आहे. दावा केला जात आहे की त्यांनी पाण्याऐवजी थुंकीचा वापर केला आहे. त्यानंतर महिलेची प्रतिक्रिया देखील समोर आली आहे. मात्र जावेद हबीब यांनी याबाबत कोणतीही पुढे प्रतिक्रिया दिली नाही. 


हा व्हिडीओ मुझफ्फरनगर इथल्या असल्याचं सांगितलं जात आहे. केस कापताना तो म्हणतो, 'माझे केस घाणेरडे आहेत, शाम्पू लावला नाही म्हणून घाण आहे, नीट ऐका, आणि पाण्याची कमतरता असेल तर असं म्हणत जावेद हबीब महिलेच्या डोक्यावर थुंबकतात... त्यांच्या या गोष्टीनंतर उपस्थित लोक टाळ्या वाजवतात. 


ज्या महिलेचे केस कापले जात आहेत ती व्हिडिओमध्ये थोडी अस्वस्थ दिसत आहे. आता या महिलेचीही प्रतिक्रिया आली आहे, ज्या महिलेच्या केसात जावेद हबीब थुंकतात, तिचे नाव पूजा गुप्ता आहे. मी त्यांच्याकडे केस कापले नाहीत. त्यांनी मला खूप चुकीची वागणूक दिली. हे गैरवर्तन केल्यानं मी त्यांच्याकडून हेअरकट केला नाही. मी गल्लीतल्या न्हाव्याकडून केस कापेन पण त्यांच्याकडून कापणार नाही अशी प्रतिक्रिया दिली आहे. 


जावेद हबीब यांच्या या गैरवर्तनानंतर आता सोशल मीडियावर नवा वाद सुरू झाला आहे. त्यांच्याविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. तर दुसरीकडे नव्या वादाला तोंड फुटलं आहे.