Jaya Kishori on Relationship :  जया किशोरी या जगातील मोटिवेशनल स्पीकरपैकी एक आहेत. सोशल मीडिया, सेमिनार आणि गोष्टींच्या माध्यमातून त्या लोकांना प्रेरित करत असतात. जया किशोरी यांनी रिलेशनशिप या विषयावरही मार्गदर्शन केलं आहे. एवढंच नव्हे तर जोडीदार निवडताना कोणती काळजी घ्याल. याबाबतही त्या मार्गदर्शन करतात. जया किशोरी यांनी मॅरेज लाईफबद्दल सांगितलेल्या या टिप्स प्रत्येक तरूण व्यक्तीला मार्गदर्शनपर ठरतील यात शंका नाही. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जया किशोरी यांना एका सेमिनारमध्ये प्रश्न केला होता की, कोणत्या व्यक्तीसोबत लग्न करावं. यावर त्यांनी उत्तर दिलं की, लग्न एक जन्मो-जन्मांच अंतर आहे. लग्न कुणी रोज रोज करत नाही. लग्न करण्यापूर्वी आपल्या जोडीदाराच्या गोष्टी समजून घेणे, जाणून घेणे अत्यंत गरजेचे आहे. 


लग्न करण्यापूर्वी जाणून घ्या या गोष्टी 


लग्न करण्याचा निर्णय घेण्यापूर्वी आपल्या जोडीदाराचा स्वभाव जाणून घ्या असं जया किशोरी सांगते. ज्या व्यक्तीसोबत आपल्याला संपूर्ण आयुष्य काढायचं आहे त्याचा स्वभाव, वागणुक समजून घ्या. ज्या व्यक्तीच्या सगळ्याच गोष्टी तुम्हाला आवडतील अशा व्यक्तीशी कधी लग्न करू नका. अशा व्यक्तीशी लग्न करा ज्याच्या गुणा-दोषांसकट तुम्ही त्याला स्वीकाराल. 



या दोन गोष्टींचा करा विचार 


एकमेकांच्या गुणा-दोषांसकट स्वीकारा. कारण फक्त प्रेम तुम्हाला कामी येणार नाही. एकमेकांच्या चुकीच्या गोष्टींना सुधारत संसार करणे यालाच तर प्रेम म्हणातत. लोक आपल्या पार्टनरच्या चांगल्या वाईट स्वभावावर प्रेम करतात तेच जीवनात यशस्वी होतात. त्यामुळे लग्न करताना या सगळ्या गोष्टींचा विचार करायला हवा. 


जोडीदारावर प्रेम करा 


जोडीदार निवडताना फक्त बाह्य रुप पाहू नका. तर त्याचा स्वभाव, विचार या गोष्टी देखील तितक्याच महत्त्वाच्या आहे. जोडीदार निवडताना तो तुम्हाला किती मान सन्मन देतो याची देखील काळजी घ्या. कारण नात्यामध्ये प्रेम आणि आपुलकीसोबतच आदर देखील तितकाच महत्त्वाचा आहे. प्रेमात आदर असणे देखील तितकेच महत्त्वाचे आहे.