चेन्नई : तमिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिता यांच्या मृत्यूचं कारण लवकरच समोर येणार आहे. जयललितांच्या मृत्यूच्या कारणाची चौकशी होणार आहे. मद्रास हायकोर्टने एका रिटायर्ड जजच्या अध्यक्षतेखाली चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पलानिसामीने जाहीर केलं आहे की, 'रिटायर्ड जजच्या नावाची घोषणा लवकरच केली जाणार आहे. मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे की, कोणताही निर्णय दबावाखाली नाही घेतला गेला आहे. पूर्व विचार करुनच निर्णय घेतला गेला आहे.'


पलानिसामी यांनी म्हटलं की, 'माजी मुख्यमंत्र्यांनी आपल्या प्रभावी कामाने राज्याचा गौरव वाढवला होता. रुग्णलयात एका आजाराशी झुंज देतांना त्यांचा मृत्यू झाला होता. त्यांच्या मृत्यूवर अनेकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते.'